अंबिजळगाव ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा
![]() |
अंबिजळगाव येथील ग्रामीण रुग्णालय सध्या शोभेचे बाहुले ठरले आहे. |
कर्जत प्रतिनिधी : दिलीप अनारसे
कर्जत – करमाळा महामार्गावरील अंबिजळगाव (ता. कर्जत) येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोणा च्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे उपचार उपलब्ध नाहीत परिणामी हे ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशीच सर्वसामान्य नागरिकांतून प्रतिक्रिया उमटत आहे. अंबिजळगाव . शेगुड. माळंगी.निंबे. डोबांळवाडी .खातगाव या भागातील नागरिकांना ग्रामीण रुग्णालय येथे किंवा कर्जत येथील ऊप जिल्हा आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन लसीकरण तसेच इतर उपचार करून घ्यावे लागत आहेत. या रुग्णालयात एक वैद्यकीय अधिकारी पाच स्टाफ आणि गावात फक्त आशासेविकाच काम करताना दिसुन येतात . कर्मचारी असताना देखील या ठिकाणी येत आले तरी लगेचच निघुन जातात वबोलतात आम्हाला दोन-चार गावचा चार्ज आसल्या मुळे आम्ही कुठे वेळ देणार मग कोरोना सारख्याच जीवघेण्या आजारावर कोणतेही उपचार केले जात नाहीत. इतर आरोग्य सुविधा देखील मिळत नसल्यामुळे या रुग्णालयाकडे रुग्णांनी नेहमीच पाठ फिरवली आहे. त्यामुळे हे आरोग्य केंद्र केवळ शोभेचे बाहुले बनले आहे. या आरोग्य विभागात आधीकार्याची कमतरता असुन देखील आधीकारी हजर करावेत . या रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर उपचारबाबत दिवसाच्या वेळी तर ड्युटीवर असणाऱ्या आरोग्य अधिकारी फोनद्वारे मार्गदर्शन करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. दिलेल्या वेळेत उपस्थित नसतात. अशा प्रकारच्या उपचारातून आरोग्याधिकारी रुग्णांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे या रुग्णालयाचा अतिरिक्त चार्ज असल्याने तेही पूर्ण वेळ या रुग्णालयाला वेळ देऊ शकत नाहीत. याकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दुर्लक्षित होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या रुग्णालयात उपचार बेभरवशाचे झाले आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुकीची गरज असताना येथील इतर दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नाहीत. अंबिजळगाव ग्रामीण रुग्णालयात covid-19 ची चाचणी व्हावी तसेच कोविड रुग्णांवर उपचार व्हावेत तसेच कोविडची लस येथे उपलब्ध व्हावी. पुरेसे कर्मचारी मिळावेत निवासी कर्मचारीच देण्यात यावा आशी मागणी ग्रामस्तांमधुन होत आहे. रुग्णालयात न राहणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. या रुग्णालयात अधीक्षकांची नेमणूक व्हावी .यांनीही या रुग्णालयाकडून आरोग्य सुविधा सुरु व्हाव्यात. मात्र उप जिल्हा आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता कर्जत जामखेड आमदार यांनी यात लक्ष घालून उप जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना तातडीने आदेश द्यावेत तसेच रुग्णालयात १० सुरू र्ग्णालयात कोरोना चाचण्यांची सोय देखील या ठिकाणी करावी. शासनाने ठरवून दिलेल्या वयोमर्यादेतील नागरिकांना या ठिकाणी कोविडची ची लस देखील उपलब्ध करून द्यावी आणि या भागातील रुग्णांची गैरसोय दूर करावी अशीही मागणी ग्रामस्तांमधुन केली जात आहे.
आतीलकर्मचा-यांना राहण्यासाठी निवासस्थान नाही असे सांगण्यात आले. हे रुग्णालय सध्या आजारी पडल्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे.