अहमदनगर मधील आज दिवसभरातील महत्वाच्या बातम्या Today’s important news of the day in Ahmednagar

 

माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट; रोहित पवारांचं आईसाठी भावूक ट्विट

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या शहरांनी ‘स्वच्छ सर्वेक्षणात’ भाग घेतला आहे. या स्पर्धेत नामांकन मिळवण्याचा निर्धाराने नागरिकांकडून गेल्या ७५ दिवसांपासून श्रमदान मोहिम राबवण्यात येत आहे. यामध्ये रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार देखील सहभागी होत आहे. त्यामुळे आपल्या आई बद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावूक प्रतिक्रियाच पवार यांनी व्यक्त केली आहे.




ग्रामपंचायतींच्या बिनविरोध निवडणुकीसाठी आमदाराकडून मिळणार ‘हे’ बक्षीस

राजकीय संघर्ष टाळण्यासाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी ‘बक्षीस’ जाहीर केले आहे. ज्या गावांच्या निवडणुका बिनविरोध होतील, त्या गावांतील विकास कामासाठी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा लंके यांनी केली आहे.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy