अहमदनगर मधील त्या कुटुंबाला बच्चू कडू यांच्याकडून मदत … तीन घरे आगीत खाक
अकोले तालुक्यातील कोंभाळणे शिवारातील आदिवासी समाजातील ठाकर वस्तीवरील तीन घरे शुक्रवारी (ता.2) सकाळी आगीमध्ये सापडली. यामध्ये दुचाकी, पैसे आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाली आहे. या दुर्दैवी घटनने गरीब कुटुंबांवर मोठा आघात झाला ,कोंभाळणे शिवारातील ठाकर वस्तीवर युवराज गावंडे, सुनीता गावंडे, सखाराम गावंडे, सखूबाई गावंडे या चौघांची कुटुंबे राहतात. ही कुटुंबे कामानिमित्त बाहेर गेली होती. त्या दरम्यान, त्यांच्या घरांना आग लागली. त्याची माहिती मिळताच कुटुंबे घटनास्थळी आली. तसेच आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील चाळीस पोती धान्य, पैसे, दुचाकी, कागदपत्रे, शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. जळते घर उघड्या डोळ्यांनी पाहताना या कुटुंबांचे अश्रू अनावर झाले.
आता या कुटुंबाला
काल सोशल मीडियावर नगर जिल्ह्यातील या मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा फोटो दिसला. आगीमुळे घरातील साहित्यासोबत या मुलाची सायकलही जळून खाक झाली होती. प्रहारतर्फे त्या कुटुंबांना तात्पुरती मदत आणि त्या चिमुकल्याला नवीन सायकल दिली. या कुटुंबांना उभे करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी मदत करणार. pic.twitter.com/l6tqX28uwn
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) April 4, 2021