आता विजेच्या मीटरचे रिडींग स्वत:च पाठवा, महावितरणाकडून ग्राहकांसाठी खास सोय
Now send the electricity meter reading-yourself आता विजेच्या मीटरचे रिडींग स्वत:च पाठवा, महावितरणाकडून ग्राहकांसाठी खास सोय
महावितरणाने मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे वीज ग्राहकांना स्वत:हून मीटर रिडींग पाठवण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. तसेच आता SMS द्वारेही मीटर रिडींग ग्राहकांना मीटर रिडींग पाठवण्यात येणार आहे. (MSEDCL Electricity consumers will now send the meter readings themselves)
मीटर रिडींग कसे पाठवाल?
प्रत्येक महिन्याच्या 1 ते 25 तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येते. महिन्यामध्ये रिडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद आहे .मीटर क्रमांक देखील नमूद आहे. रिडींगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसाआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येईल. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे रिडींग पाठविता येईल.
तसेच मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रिडींग पाठविता येणार आहे. SMS द्वारे मीटर रिडींग कसे पाठवाल? ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविण्यासाठी ग्राहकांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेला असणे आवश्यक आहे. या नोंदणीकृत मोबाईलवर मीटर रिडींग पाठविण्याबाबतचा मेसेज प्राप्त होईल. यानंतर पुढे चार दिवसांपर्यंत ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविणे आवश्यक आहे. वीजग्राहकांनी MREAD<स्पेस><12 अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस><KWH रिडींग 8 अंकापर्यंत> असा ‘एसएमएस’ 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे. उदा. 12 अंकी ग्राहक क्रमांक 123456789012 हा असल्यास आणि मीटरचे KWH रिडींग 8950 असे असल्यास MREAD 123456789012 8950 या प्रकारचा ‘एसएमएस’ पाठवायचा आहे. चुकीचे किंवा मुदतीनंतर पाठविलेले मीटर रिडींग स्वीकारण्यात येणार नाही. ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविण्याची सोय केवळ कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध राहणार आहे. (TV ९ मराठी )