आमदार फंडातून कर्जतसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी दाखल

 

कर्जत / सुभाष माळवे

         कर्जतची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, तालुक्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत,कोणत्याही रुग्णास उपचाराअभावी त्रास सहन करावा लागू नये म्हणून आ. रोहित पवारांनी कर्जतच्या रुग्णसेवेत  एक अद्ययावत रुग्णवाहिका दाखल केली आहे.

      आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यासाठी ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहे.सध्या कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कर्जत आरोग्यविभाग आणि स्थानिक प्रशासन जीव ओतून काम करत आहे. आ.रोहित पवार यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आरोग्यासाठी मतदारसंघात गरजेनुसार  कोव्हिड सेंटरची उभारणी केली आहे.

या सेंटरसाठी लागणाऱ्या आरोग्य सुविधा वेळेत मिळवण्यासाठी त्यांच्याकडुनही  प्रयत्न सुरू आहेत.कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी राज्यशासनाकडून आरोग्य सुविधांकडे लक्ष दिले जात आहे.रुग्णांना तात्काळ सुविधा मिळाव्यात, त्यांना अत्यावश्यक उपचारासाठी घेऊन जाणे,त्यांना उपचाराच्या ठिकाणाहून पुन्हा घेऊन येणे शक्य व्हावे यासाठी ही रुग्णवाहिका महत्वाची भूमिका बजावणार आहे.

 कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यशासनाने प्रत्येक मतदारसंघातील आमदारांसाठी आरोग्यावर खर्च करण्यासाठी ठराविक निधी उपलब्ध करून दिलेला आहे.मात्र आ.रोहित पवारांनी राज्यशासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीपेक्षा अधिक निधी मतदारसंघातील आरोग्यसेवेसाठी खर्च केला आहे.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy