आ.रोहित पवारांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक
![]() |
कोरोनाच्या कठीण काळातही आपल्या पदाची झुल बाजुला ठेऊन कर्जतचे विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी स्थानिक पातळीवर उतरून लढत आहेत.आपल्या कामाची जबाबदारी तर पार पाडत आहेतच पण हे करत असताना ते आपल्या अंगी असलेल्या माणुसकीचे दर्शन घडवत समाजासमोर आदर्श निर्माण करत आहेत.त्यांच्या या कामांचे आ.रोहित पवारांनीही कौतुक केले आहे.मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी जेंव्हा लोकहिताचे चांगले काम करतो तेंव्हा अधिकारी आणि नागरिकही त्या कामास चांगला प्रतिसाद देऊन ‘नव्या पर्वाचे’ साक्षीदार होतात.तसाच बदल आता कर्जत या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
(दि.१८ रोजी) पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तहसीलदार नानासाहेब आगळे, गट विकास अधिकारी अमोल जाधव, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव,तालुका आरोग्य अधिकारी संदीप पुंड तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक स्वच्छता दूतांनी उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हिड सेंटर असलेल्या ठिकाणच्या रिकाम्या बाटल्या, कचरा, नाश्त्याची व जेवणाची अर्धवट खरकटी पाकिटे,निकामी पिशव्या आदी स्वतः उचलून येथील परिसरही स्वच्छ केला. भितीपोटी कोव्हिड परिसराच्या आसपासही कुणी धजावत नाही तिथे या अधिकाऱ्यांनी काम केले आहे.कर्जत शहरात गेल्या दोनशे दिवसांपासून श्रमदान करणाऱ्या स्वच्छता दूतांनाही यामुळे प्रोत्साहन मिळत आहे.सध्या कोव्हिड परिस्थितीत आ.रोहित पवारांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी,त्यांची कोरोनापासून सोडवणूक करण्यासाठी मतदारसंघात सर्वसुविधायुक्त कोव्हिड सेंटर उभी केली आहेत.नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकारामुळे कोव्हिड रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ.रोहित पवार यांनी हे सर्वात मोठे भरीव काम केलेले आहे.असे असले तरी जेंव्हा लोकप्रतिनिधी चांगली कामे करत असतो त्यावेळी अधिकारी आणि नागरिकही प्रतिसाद देत असतात तोच बदल सध्या पहावयास मिळत आहे.समाजासमोर वेगळा आदर्श ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बळावरच कर्जत जामखेड हा मतदारसंघ ‘रोल मॉडेल’ म्हणुन विकसित होईल.लोकप्रतिनिधी म्हणुन येथील अधिकाऱ्यांचा व स्वच्छता दूतांचा अभिमान वाटत असल्याचे मत आ.रोहित पवार यांनी व्यक्त केले.
___________________________________
माझी विनंती आहे मदतीसाठी पुढे या !
कोरोनावर यशस्वी मात करण्यासाठी सर्व विभागाचे आपले अधिकारी-कर्मचारी जीव ओतून काम करत आहेत. आपल्या रुग्णांना लवकरात लवकर या महामारीतुन सुखरूप बाहेर काढायचे आहे.आता वैद्यकीय अनुभव असलेल्या किंवा वैद्यकीय शिक्षणात पारंगत असलेल्या लोकांनी पुढाकार घेऊन कर्जत व जामखेडच्या शासकीय रुग्णालयांना मदत करावी अशी मी विनंती करतो.
-आ. रोहित पवार