इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल , इथे पाहू शकता निकाल । Maharashtra Supplementary Exam Results
इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल , पाहू शकता निकाल । (Result of supplementary examination of class X and XII)
इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल (Result of supplementary examination of class X and XII) बुधवार २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १ वाजता http://mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर होणार. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती.
इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल कुठे पाहाल
निकाल पाहण्यासाठी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी या संकेतस्थळाचा वापर करू शकतात
लिंक – http://mahresult.nic.in
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून इ. दहावी व इ. बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून इ. दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/ शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी गुरुवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ ते शनिवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरूवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ ते मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल.