इसरो ची माहिती मराठी : isro full information in marathi

 

इसरो ची माहिती मराठी : isro full information in marathi
इसरो ची माहिती मराठी : isro full information in marathi 

बऱ्याच जणांन इसरो चा फुल फॉर्म माहित नाही मित्रानो Isro full form हा आहे ,भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) आता आपल्याला इसरो म्हणजे नेमकं काय आहे हे नक्की समजले असेल ,आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बद्दल अधिक माहिती आणि इतर  काही विषयांवर देखील माहिती पाहणार आहोत .

 ( isro full information in marathi ) इसरो ची माहिती मराठी

भारतीय अंतराळ संशोधन संस्था,म्हणजेच इसरो हि जगभरातील अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थांपैकी एक अग्रगण्य संस्था आहे .इसरो हि भारत सरकारच्या अधिपत्याखाली काम करते .इस्रोपाशी तिच्या स्वतःच्या अनेक उभारण्या आहेत. द्विपक्षीय आणि अनेकपक्षी करारांमुळे ती संस्था जागतिक देशसमू्हांशी सहकार्य करत असते.

सन १९४५ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च च्या उभारणीत ज्यांची महत्त्वाची भूमिका होती, ते अहमदावाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळा सुरू करणारे विक्रम साराभाईहोमी भाभा, या दोघांचा भारताच्या एकत्रित अंतराळ संशोधनात मोलाचा वाटा आहे.अंतराळ संशोधनातील प्राथमिक प्रयोगात, वैश्विक किरण, अत्युच्च पातळीवर व अवकाशात अनेक उपकरणांची तपासणी, आणि जगात सर्वांत खोल खाणींपैकी एक समजल्या जाणाऱ्या कोलार येथील खाणीत केलेले अनेक महत्त्वाचे प्रयोग इत्यादींचा, तसेच, पृथ्वीवरील वातावरणाचा अभ्यास आदींचा समावेश होतो. हा अभ्यास संशोधन प्रयोगशाळेत, अनेक विद्यापीठांत आणि वेगवेगळ्या स्वतंत्र जागेत केला गेला. सन १९५०मध्ये जेव्हा भारत सरकारने अणुऊर्जा खात्याची स्थापना केली व होमी भाभा यांना त्याचे सचिव म्हणून नेमले, तेव्हा अंतराळ संशोधनात सरकारचा दृश्य सहभाग दिसून आला .

चंद्रयान १ : चांद्रयान १ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चांद्र मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक, तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.सी११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण ऑक्टोबर २२, इ.स. २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर ८ रोजी यानास यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले.  १४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेले चांद्र आघात शोधयान यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले. जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील ‘शॅकलटन क्रेटर’ येथे आदळला. या घनाकृती प्रोबच्या चार बाजूवर भारताचा ध्वज चित्रित असल्यामुळे प्रतिकात्मकरित्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.  मंगळ स्वारी इस्रोने मंगळस्वारीच्याही मोहिमेची तयारी सुरू केली असून त्यासाठी रु. १० कोटी त्यांना सरकारद्वारे प्राप्त झाले आहेत.सन २०१३ ते २०१५ दरम्यान ही संस्था त्याच्या प्रक्षेपणासाठी संधी शोधत आहे.  ही अवकाश संस्था, उपग्रहास कक्षेत ठेवण्यास, त्यांचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान वापरेल त्यानंतर आयन थस्टर्स तरल इंजिन किंवा आण्विय उर्जा वापरून त्याचे मंगळाकडे उड्डाण करेल.मंगळ मोहिमेचा अभ्यास आधीच संपला आहे व ते अवकाश संशोधक वैज्ञानिक प्रस्ताव व वैज्ञानिक ध्येये शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. (विकिपीडिया )

pdf डाउनलोड करण्यासाठी इथे क्लीक करा .

अवकाश मोहीम म्हणजे काय ?

अवकाश तंत्रज्ञान चे महत्व ?

भारतीय अवकाश मोहीम माहिती ?

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy