ईस्टर संडे ।ईस्टर संडे रविवार।ईस्टर दिवस काय करातात । Easter Sunday. Easter Sunday Sunday. What do Easter Days do?

 


ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी ४० दिवसांच्या उपवासाचा (लेन्ट) हा काळ संपतो.  ईस्टरचा आठवडा पवित्र आठवडा म्हणून ओळखला जातो. यातील शेवटचे तीन दिवस म्हणजते मौन्द्य गुरुवार, उत्तम शुक्रवार (इंग्लिश: Good Friday) व होली सॅटर्डे होत. त्यानंतरचा रविवार हा ईस्टर असतो.  ईस्टर ची तारीख दरवर्षी बदलते कारण वसंत संपात पौर्णिमेच्या नंतरचा पहिला रविवार म्हणजे ईस्टर असे इसवी सन ३२५ मध्ये भरलेल्या ख्रिस्ती बिशप लोकांच्या संमेलनात ठरवले गेले. यहुदी लोकांच्या पासोव्हर या सणाच्या ऐवजी ईस्टर साजरा केला जातो असे काहींचे म्हणणे आहे. कारण बर्याच युरीपियान भाषांमध्ये ईस्टर हा शब्द पासोव्हरचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.  ईस्टर साजरा करण्याच्या पद्धती मात्र देशागणिक वेगळ्या आहेत. प्रोटेस्टंट पंथीय लोकात “प्रभू उठला आहे” असे म्हणून येणाऱ्यांचे स्वागत केले जाते तर दुसरा माणूस ” हो खरच प्रभू उठला आहे” असे म्हणून त्या स्वागतास प्रत्युत्तर देतो. काही देशात ईस्टर अंडी सजवण्याची प्रथा आहे. येशू नसलेल्या रिकाम्या कबरीचे प्रतिक म्हणजे अंडे. आणि प्रभू मृतातून उठला याचा आनंद झाला म्हणून अंडे सजवायचे अशी कल्पना आहे. काही पंथात सूर्योदयाच्या वेळी प्रार्थना केली जाते.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy