बांधकाम, वस्त्रोद्योग, मासेमारी, गिग आणि प्लॅटफॉर्म(ई-कंपन्या) काम, रस्त्यावरील विक्री, घरगुती काम, शेती आणि संलग्न, वाहतूक क्षेत्र अशा विविध व्यवसायातील कामगारांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. यापेकी काही क्षेत्रांमध्ये स्थलांतरित कामगारांचा देखील समावेश आहे. स्थलांतरित कामगारांसह सर्व असंघटित कामगार आता ई–श्रम पोर्टलवर केलेल्या नोंदणीच्या माध्यमातून विविध सामाजिक सुरक्षा आणि रोजगारावर आधारित योजनांचा लाभ घेऊ शकतात.
कामगारांना पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी त्यांच्या जवळच्या सीएससीला भेट देण्यास प्रोत्साहित केले जाते आणि या योजनेचा लाभ त्यांनी घ्यावा, जेणेकरून विविध कल्याणकारी कार्यक्रम राबविताना अखेरच्या व्यक्तीपर्यंत ते पोचविणे सहज शक्य होऊ शकेल.
नोंदणीसाठी आवश्यक माहिती आधार क्रमांक आधार जोडलेले सक्रिय मोबाईल नंबर बँक खाते तपशील वय 16-59 वर्षे (18-10-1961 ते 17-10-2005) दरम्यान असावे
खालील वेबसाईट वर जाऊन तुमच्या आधार कार्ड द्वारे अर्ज करू शकता. किंवा जवळच्या csc केंद्रात देखील नोंदणी करू शकतात .