कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी आता १०० खाटांची मंजुर 100 beds sanctioned for Karjat sub-district hospital

 

Rohit pawar

आ.रोहित पवारांचा पाठपुरावा;लवकरच प्रशस्त इमारत आणि मनुष्यबळही.

        कर्जत तालुक्यात सध्या उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित आहे मात्र या रुग्णालयातून रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा मिळण्यास आणि येथून जिल्हा रुग्णालयाचे अंतर जास्त असल्याने वैद्यकीय सेवा मिळण्यास मर्यादा येत आहेत.कर्जत तालुका हा अवर्षण प्रवण भागात मोडत असुन तालुक्यात खाजगी रुग्णालयाचे प्रमाणही कमी आहे.वाढती लोकसंख्या, अपघाताचे प्रमाण,तात्काळ आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे सध्या येथे उपलब्ध असलेल्या ५० खाटांचाही तुटवडा भासत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.रोहित पवार यांनी याविषयी लक्ष घालून कर्जत येथे उपजिल्हा  रुग्णालयासाठी आता १०० खाटांची मंजुरी मिळवली आहे.येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांवरून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास ‘विशेष बाब’ म्हणुन मान्यता देण्यात आली आहे. आ. रोहित पवार यांनी प्रयत्न आणि पाठपुरावा करून आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून ही मान्यता मिळवली आहे.संबंधित रुग्णालयासाठी जागा अधिग्रहीत करने,बांधकाम करणे व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे.कर्जत तालुक्यासाठी  १०० खाटांच्या मंजुरीमुळे नागरिकांना आता वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.खाजगी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घेणे गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही.कर्जतकरांसाठी आ.पवार यांनी घेतलेला हा निर्णय खुपच महत्वपूर्ण असुन आरोग्याबाबत त्यांचे व्हिजन पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.कर्जत व तालुक्यातील जनतेकडून आ. रोहित पवार यांचे आभार मानण्यात येत आहेत.

नागरिकांच्या अडचणी सोडवण्यास कटिबद्ध!

     येथील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी मी कायम कटिबद्ध राहील.रस्ते, पाणी या प्रशांबरोबरच आरोग्याचा प्रश्नही माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे.हे रुग्णालय झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे.लवकरच आता प्रशस्त इमारत आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचे आ. रोहित पवार यांनी बोलताना सांगितले.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy