कर्जत जामखेड : रोहित पवारांकडून ३०० रॅमिडीसीविर ,१०,००० एन-९५ मास्क, मतदारसंघात ६५० बेडचीही व्यवस्था.

रोहित पवार

दिलीप अनारसे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यशासन हादरले आहे.जिल्ह्यात आणि तालुक्यातही रुग्णांची वाढती संख्या विचार करायला लावणारी आहे. ही वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आ. रोहित पवार पुन्हा एकदा सरसावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून आता पुणे, नगर, बीड,सोलापूर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तुटवडा असलेल्या ३०० रॅमिडीसीविर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात आली आहे.नगर येथील कोरोनाचा वाढता आकडा पाहता तेथील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला आपल्या सुरक्षिततेसाठी जिल्हा रुग्णालयास ५००० एन-९५ मास्क तर कर्जत-जामखेडसाठी ५००० एन-९५ मास्क पाठवण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन सिलेंडर हे कर्जतसाठी २५ तर जामखेडसाठी २५ आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत. कर्जत तालुक्यातील रुग्णांचा झपाट्याने वाढत असलेला आकडा कमी करण्यासाठी आ. रोहित पवारांच्या माध्यमातून पुणे मुंबई शहरांच्या धरतीवर रुग्णांसाठी ३५० अद्ययावत बेडची व्यवस्था कर्जत जवळील गायकरवाडी येथे करण्यात येत असुन जामखेड येथेही ३०० बेडचे कोरोना सेंटर व्यक्तिगत स्वरूपातून उभा करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्वतः रक्तदान करत केले रक्तदानाचे आवाहन!

        राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताअभावी कुणालाही आपला जीव गमावू लागू नये यासाठी राज्यातील युवांनी पुढाकार घेऊन प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून रक्तदान करावं असे आवाहन आ.रोहित पवारांनी सोशल मिडियावर केले आहे. स्वतः रक्तदान करत त्यांनी दिलेला हा संदेश युवकांना प्रेरित करणारा आहे.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy