कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यांची धुराडी झाली बंद : ऊस गळीत हंगाम संपला, ऊसतोड मजूर निघाले आपुल्या गावा…Ambalika sugar factories shut down
कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यांची धुराडी झाली बंद : ऊस गळीत हंगाम संपला, ऊसतोड मजूर निघाले आपुल्या गावा…
कर्जत प्रतिनिधी ( दिलीप अनारसे) कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामाची सांगता होत आहे. तालुक्यातील अंबालिका साखर, व करमाळा तालुक्यातिल भैरवनाथ शुगर, तसेच कमलाई शुगर या कारखान्याची धुराडी बंद झाली होती तर भिमा नदी लाभक्षेत्रातील ऊस बारामती ॲग्रो,अंबालिका शुगर आदि कारखान्याकडे जात होता दरम्यान या कारखान्याचीही ऊस गाळप सांगता जवळ आली आहे.
क्षेत्रातील राशिन, कर्जत , मिरजगाव, अंबिजळगाव , टाकळी खं, धांडेवाडी आदी भागातील ऊसतोड शेवटच्या टप्प्यात आला आहे अडचणीच्या ठिकाणी राहिलेला ऊसही आता संपला आहे.यावर्षी उसाचे जादा उत्पादन झाल्याने सर्वच कारखान्यांचे गाळप सरासरी वाढले होते त्यामुळे ऊसतोड मुकादमाकडे ऊसतोड मजुरांची असलेली उचलही फिटली होती.
त्यामुळे ऊसतोड मजूरनाही ऊसतोड संपून गावाकडे जाण्याची वेध लागले होते.गाळप हंगाम समाप्तीकडे जात असताना शेवटच्या खेपेचा प्रवास ऊसतोड मजुर मोठ्या टेपच्या गाण्याच्या तालावर ऊसतोड मजुरानी आनंदात,उत्साहात व जल्लोषात करीत असल्याचे चित्र आहे.