कर्जत तालुक्यातील घटना: चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी
कर्जत/ सुभाष माळवे : तालुक्यातील निंबोडी या गावांमध्ये चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात खंडू गरड (वय ५०) वर्ष व भरत बर्डे (वय ३५ ) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.बापूराव गरड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्या विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सौरभ अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.तसेच श्वानपथक व ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले होते.गोळीबाराचा प्रथमच प्रकार घडल्याने ग्रामस्थ दहशतीखाली आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील निंबोडी या गावामध्ये काल मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास तिघे चोरटे आले होते. त्यांनी प्रदीप गरड यांची शेळी चोरून घेऊन जात असताना प्रदीप गरड जागे झाले, त्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांची इतर नातेवाईकही जागे झाले. त्यावेळी तीन चोरट्यांनी शेळी घेऊन धूम ठोकली.या वेळी आरडा ओरड एकूण शेजारी जागे झाले त्यातील सहा जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. या तील बापूराव गरड यांनी मोटार सायकल वर बसलेल्या तिघा पैकी मागे बसलेल्या चोरट्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली.असता त्याच्यात झटपट झाली ही झटपट अर्धतास चालली.त्या वेळी गावातून मोठा जमाव एकत्र येत असून आपले काही खरे नाही असे चोरट्यांना वाटल्याने मोटारसायकल वर मध्यभागी बसलेल्या चोरट्याने आपल्या गावठी कट्ट्यातून पाठलाग करणाऱ्या दोघांवर गोळीबार केला . यामध्ये खंडू गरड व भरत बर्डे हे गंभीर जखमी झाले. या दोघांना उपचारासाठी नगर येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या बाबत माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळी दोन जिवंत काडतुसे सापडली आहेत.