कर्जत ते पंढरपूर पर्यावरण जनजागृतीची सायकल वारी
कर्जत (प्रतिनिधी)दिलीप अनारसे:-स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि माझी वसुंधरा अंतर्गत कर्जत शहरात गेली 4 महिने स्वच्छतेसह वृक्षारोपन करण्याचे काम सुरू आहे. कर्जत शहराबाहेर जाऊन स्वच्छतेचे लोण संपूर्ण तालुकाभर पसरलं आहे. यामध्ये स्वच्छता करतानाच सायकल वापरणाऱ्या शताब्दी महोत्सवाच्या दिवशी सर्वानी एक मोठी सायकल रॅली ही काढली होती. याच्या माध्यमातून नुकतीच काही सदस्यांनी कर्जतचा डंका सर्वत्र पसरविण्यासाठी आणि माझी वसुंधरा अभियान संदर्भात जनजागृती करण्यासाठी कर्जत ते पंढरपूर अशी सायकल जनजागृती काढण्या चा निर्णय घेतला.
दि 30 जाने रोजी कर्जत मधील सायकल क्लबच्या सदस्यांनी पहाटे 4 वा कर्जतचे ग्राम दैवत संत श्री गोदड महाराज मंदिरा समोर जमून दर्शन घेत ही रॅली सुरुवात झाली . यामध्ये कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, नितीन देशमुख, अक्षय राऊत, अतुलशेठ कुलथे, राहुल नवले, तात्या क्षीरसागर, घनश्याम नाळे, दीपक माने, विशाल तोरडमल, शेरखान पठाण,महेश राऊत, सुमितजी राऊत,शुभम क्षीरसागर, प्रतिक राऊत, प्रदीप कळसाईत, माऊली थोरात, गणेश सातव, गिरीश गुंड, अशिष शेटे, यांनी मजल दर मजल करत सायं 4 वाजे पर्यत पंढरपूर गाठले, रस्त्या मध्ये पंढरपूरच्या पायी दिंडी वारकऱ्यांप्रमाणे या सर्वाना चहा, नाश्ता, शेंगदाणे लाडू, दुपारचे जेवण, असा आदर सत्कार अनेकांनी केला. सर्वानी चंद्रभागेत दर्शन घेत पांडुरंगाच्या चरणी नत मस्तक होत कर्जतचा स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि माझी वसुंधरा या दोन्ही अभियानात 1 नंबर यावा असे साकडेच सर्वांनी विठुरायाला घातले रखुमाईला हात जोडून हीच प्रार्थना केली. दरम्यान पंढरपूर च्या नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी सर्वाचे फुलांचे हार घालून स्वागत केले. अत्यंत उत्साहात या सर्वानी कर्जत शहरातील स्वच्छ कर्जत अभीयानाचा डंका पंढरपूरात वाजवत विठुरायाच्या निरोप घेतला.