कर्जत शहरातील पत्रकार मुन्ना पठाण यांचे चिरंजीव जिशान व अफरोज पठाण यांची कन्या जिया या दोघां बहीण – भावाने आपला पहिला रमजानचा रोजा बुधवारी पूर्ण केला. आजपासून रमजान महिन्यास प्रारंभ झाला असून या पठाण कुटुंबियाच्या बहीण – भावाने भर उन्हाळ्यात निरंक रोजा ठेवत तो पूर्ण केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. नन्हे रोजदार जिशान व जिया
पठाण हे कर्जत शहरातील वृत्तपत्र वितरक लतीफभाई पठाण यांचे नातू आहे. तर जिशान आणि जिया यांचे कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे, अशिष बोरा, गणेश जेवरे, सुभाष माळवे, मच्छिंद्र अनारसे, निलेश दिवटे यांनी अभिनंदन केले आहे.
You might also like