कर्जत पंचायत समितीच्या पहिला मजला बांधकामास व इतर उपकामास मंजुरी Sanction for construction of first floor and other sub-works of Karjat Panchayat Samiti

रोहित पवार

आ. रोहित पवारांचा पाठपुरावा; ३ कोटी ८८ लक्ष ६० हजार रुपयांचा निधी

       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आ.रोहित पवार यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून कर्जत पंचायत समितीच्या तळमजला इमारतीवर पहिल्या मजल्याचे प्रशस्त बांधकाम होणार असल्याने या इमारतीची शोभा वाढणार आहे. पंचायत समितीच्या पहिल्या मजला बांधकामास व इतर उपकामास मंजुरी मिळाली असुन या कामासाठी सुमारे ३ कोटी ८८ लक्ष ६० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

     कर्जत येथील पंचायत समितीचे तळमजल्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे.पंचायत समितीतील वेगवेगळ्या विभागांची कामे सध्या याच तळमजल्याच्या इमारतीत पार पडतात. मात्र पंचायत समितीच्या कामाचा आणि विविध विभागाचा आवाका पाहता सध्या कार्यान्वित असलेली जागा अपुरी पडत आहे.आता या नियोजित पहिल्या मजल्याचे बांधकाम मूळ तळमजल्याच्या इमारतीवर करण्यात येणार आहे.कर्जत येथील पंचायत समितीच्या तळमजल्यात महिला पदाधिकाऱ्यांसाठी प्रसाधनगृहासह विश्रांती कक्षाची व्यवस्था करण्यात आली नसल्याने तशी व्यवस्था पहिल्या मजल्यावर करण्यात येणार आहे.या बांधकामात ग्रीन संकल्पना,नैसर्गिक प्रकाशयोजना व वायूवीजन,पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर,पर्जन्य जलपुनर्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपुरक बांधकाम साहित्य व साधन सामुग्रीचा वापर करण्यात येणार आहे.पंचायत समिती प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याचे ६९८.९० चौ.मी. क्षेत्रफळाचे बांधकाम प्रस्तावित केलेले आहे.प्रशासकीय कार्यालयांचा आ.पवार यांच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने होत असलेला कायापालट नागरिकांच्या अडचणी एकाच छताखाली सोडवण्यासाठी फायद्याचा ठरत आहे.

सगळी कामे एकाच छताखाली व्हावीत असा प्रयत्न!

       ‘पंचायत समितीची तळमजला इमारत नजीकच्या काळात झाली असली तरी ती पावसाळ्यात गळत आहे तसेच त्यामध्ये अनेक त्रुटीही आहेत.पहिल्या मजल्याच्या नियोजनात आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी करून घेण्यात येतील. कोणतीही व्यक्ती आल्यावर त्या व्यक्तीची कामे एकाच छताखाली व्हावीत असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.वेगवेवेळ्या विभागाचे अधिकारी एकाच ठिकाणी असतील तर गटविकास अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy