कर्जत येथील आम्ही कर्जत चे सेवेकरी यांनी कर्जत ची ओळख नविन करण्याचा प्रयत्न केला आहे
स्वच्छता दूत यांनी कर्जत ची नवीन ओळख तयार केली रविंद्र बडवे
कर्जत / सुभाष माळवे
कर्जत येथील आम्ही कर्जत चे सेवेकरी यांनी
कर्जत ची ओळख नविन करण्याचा प्रयत्न केला आहे. असे प्रतिपादन रविंद्र बडवे यांनी येथील भापकर फार्म हाऊस वर झालेल्या स्वच्छता दूत यांच्या साठी आयोजित स्नेह भोजन प्रसंगी केले.
स्वच्छता दूत व सर्व जणांनी काम केले आहे. त्यांनी अतिशय सुंदर काम करून कर्जत च्या वैभवात भर घातली आहे म्हणून त्यांचे
कौतुक झाले पाहिजे या हेतूने येथील अॅड भापकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. असे म्हणत बडवे यांनी पुढे म्हटले की,
पर्यावरण संरक्षण करण्याची जबाबदारी ही कर्जत करांची आहे. नगर जिल्हयात नव्हे तर महाराष्ट्र राज्य व देशात कर्जत चे
नाव लौकिक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत कर्जत चे नाव लौकिक देशात
प्राप्त होईल अशी सदिच्छा व्यक्त करून कर्जत चे हे जनआंदोलन राज्यात झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.