कर्जत येथे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतर्फे निषेध आंदोलन
कर्जत प्रतिनिधी -दिलीप अनारसे — ग्रामविकास विभागाने 14 जानेवारी 2021 रोजी आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पा संदर्भात 2 शासन निर्णय काढून संगणकपरिचालकांना फक्त 1000 रुपये मानधन देऊन आपल्या जखमेवर मीठ चोळले आहे.यासाठी राज्यस्तरावर मुंबई येथे कसे आंदोलन करायचे यावर सर्व जिल्हाध्यक्ष व राज्य संघटना विचार व योग्य नियोजन करून निर्णय घेत आहे.परंतु आपल्या सर्वांचा या सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध असल्याचे शासनाला कळाले पाहिजे म्हणून पंचायत समिती कार्यलया समोर काळ्या फिती लावून निदर्शने करायची आहेत.त्यामुळे सर्वांनी जि आर हातात घेऊन हे आंदोलन करायचे आहे.जि आर जाळताना कुणाला इजा होईल असे काही करू नका अन्यथा जि आर न जाळता सुद्धा जि आर हातात ठेवा व घोषणा बाजी करत काळ्याफिती लावून निदर्शने करा आणि आपले निवे
दन bdo साहेबांना देऊन आंदोलन संपवा. त्यासाठी 1)ज्यांनी अद्याप मा.गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष निवेदन दिले नसेल त्यांनी ईमेल द्वारे निवेदन द्यावे,त्याची एक प्रत स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी. 2)आंदोलनासाठी संघटनेचे एक बॅनर मागे लावा. 3)आंदोलनाचा वेळ 11.00 चा असला तरी 10 वाजता पंचायत समिती समोर एकत्र या 4)हातातील घोषणा फलक तयार करून हातात घ्या. 5)सर्वांनी काळ्या फिती लावा 6)जास्तीत जास्त 1 तासात हे आंदोलन संपेल 7)प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन झालेच पाहिजे,सर्वांच्या प्रश्नासाठी हे आंदोलन आहे. 8)ह्याने काय होते त्याने काय होते असे म्हणण्यात काहीही अर्थ नसतो,सध्या शासनाला आपला उद्रेक राज्यातून दिसला पाहिजे,त्यासाठी इथे आंदोलन करायचे आहे.यानंतर राज्यस्तरावर मुंबई ला आंदोलन होईल.हा शासन निर्णय जरी ग्रामविकास विभागाने काढला असला तरी आपण राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेबाकडे हा निर्णय रद्द करणे बाबत आक्षेप नोंदवला आहे.ते आपल्या आक्षेपाची दखल घेतील परंतु या सोमवारच्या आंदोलनात शासनाला दिसले पाहिजे की आपण सर्वजण या शासन निर्णयावर नाराज आहेत म्हणून,त्यासाठी सर्वांनी कामाला लागून योग्य नियोजन करा. प्रत्येक तालुक्यात आंदोलन झालेले फोटो अँगल कॅम्प मध्ये तालुकाध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्ष यांना पाठवावेत जिल्हाध्यक्ष राज्यकमिटी ला पाठवतील. संगणकपरिचालक सिद्धेश्वर मुंडे राकेश देशमुख मयुर कांबळे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव