कांतीलाल घोडके जि.प.सदस्य यांचे कोरोनाने पुणे येथे निधन
कर्जत (प्रतिनिधी):-राशीन जिल्हा परिषद गटाचे जि. प. सदस्य कै कांतीलाल दादा घोडके यांचे रविवार दि. 11/4/21 रोजी रात्री कोरोनाने पुणे येथे दुःखद निधन झाले .अत्यंत बोलके व मनमोकळ्या स्वभावाचे कांतीलाल घोडके हे संघाचे स्वयंसेवक होते, त्यांनी आपल्या वक्तृत्वा ने आपले वेगळे पनाणे सर्वाना जिंकले होते. ते भाजपाच्या तिकिटावर राशीन गटातून निवडून आलेले जी. प. सदस्य होते. घोडके आपल्यातून गेले ही मनाला धक्कादायक वेदना देणारी व दुःखदायक घटना आहे त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो या सद्गुरू गोदड महाराज व आई जगदंबेला प्रार्थना करताना माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून केली. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून तालुक्यात सर्वत्र त्याच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोरोणा चा कहर सर्वत्र पहावयास मिळत आहे दिवसेंदिवस कोरोणा रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना नागरिकांनी याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक असताना अनेक लोक अद्यापही नियम पाळताना दिसत नाहीत सध्या प्रशासन आरोग्य विभाग हे मोठ्या कष्टाने नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहेत, मात्र त्यांना सहकार्य करण्याऐवजी नियम मोडण्यात अनेकांना धन्यता वाटत असून नागरिकांनी या गंभीर परिस्थितीचा स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी विचार करावा व प्रशासनाला सहकार्य करावे. कामाशिवाय विनाकारण घराबाहेर पडू नये
सोशल डीस्टन्स चा वापर करावा, मास्क वापरावा व आपल्या कोरोणा टेस्ट लक्षणे दिसताच वेळच्या वेळी करून घ्यावी, घाबरून जाऊ नये, कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आपल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर बोलावे, चर्चा करावी मार्ग निघू शकतो, त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, कोरोना हा आजार घाबरून गेल्यानेच जास्त बळावत असून जास्त घाबरलेल्या व्यक्तींच्या जिवावर बेतत असल्याचे लक्षात येत आहे, त्यामुळे सर्वात चांगला उपाय म्हणून नागरिकांनी त्वरित लक्षणे वाटू लागली की आपली चाचणी करून घ्यावी व कोरोणा पॉझिटिव्ह निघाल्यानंतर घरातच क्वारंटाईन व्हावे अन्यथा प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेत सहभागी होऊन सहकार्य करावे, जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचे काम प्रशासन करत असून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी काही दिवस आपण समजून उमजून काम करणे आवश्यक आहे. याबाबत बेफिकीरपणे वागणाऱ्या लोकांना कंट्रोल करण्याची ही जबाबदारी आता नागरिकांनीच घेण्याची आवश्यकता आहे, त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केल्यास नक्कीच आपण या लढाईत जिंकू शकतो असा विश्वास आहे.