कुकडी पाणी तात्काळ सोडा -Sudam Nikat

 

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुकडीचे आवर्तन 10 मे रोजी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला . हा निर्णय अन्यायकारक आहे . तात्काळ शेतीला पाणी मिळाले नाही तर पिके जळून नष्ट होतील . त्यामुळे कुकडीचे आवर्तन तात्काळ सोडा अशी मागणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुदाम निकत यांनी केली आहे . बैठकीतील निर्णय पारनेर , श्रीगोंदा , कर्जत , करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात आहे . या आवर्तनाला होणाऱ्या विलंबामुळे या तालुक्यातील शेतातील पिके जळून जातील . शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे . बैठकीत घेतलेला निर्णय एकतर्फी आहे . तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी जागृत राहून शेतकरी हिताचा संबंधी हिताचा निर्णय घ्यावा. बाकी घोड व सिनाचे आवर्तन सोडले असताना कुकडी आवर्तनलाच उशीर का ? असा सवालही त्यांनी विचारला आहे. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यामुळे शेतकऱ्यांसमोर हे सुलतानी संकट उभे राहिले आहे . याचा आम्ही शेतकरी म्हणून तीव्र शब्दात निषेध करत आहोत . अजूनही वेळ गेली नाही . लोकप्रतिनिधींनी आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरून बैठकीत झालेला निर्णय बदलून कुकडीचे आवर्तन तात्काळ सोडण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा . तरच कर्जत तालुक्यातील बळीराजा वाचेल .

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy