कोंबड्यांच्या तुटवड्यामुळे चिकन व अंड्याचे दर वाढले
कर्जत प्रतिनिधी (दिलीप अनारसे) काही वर्षापूर्वी बर्ड फ्लू व त्यानंतर गेल्यावर्षी आगमन केलेल्या कोरोना संसर्गामुळे चिकन व अंडी याचे दर नीचांकी पातळीवर गेले होते. मिळेल त्या दरात चिकन विक्री होत होती परंतु, सध्या 200 ते 220 रुपये या दराने चिकन विक्री होत आहे त्यातच चिकन,कोंबड्यांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असा प्रकार घडत असल्याने ग्राहकांना चिकन मिळणे अवघड झाले आहे.
महिनाभरापूर्वी चिकनचे दर 140 ते 150 साठ रुपये किलो असे होते ते पुढे 180 रुपये असा झाला तर आता 200 ते 220 रुपये किलोवर चिकन गेले आहे.सर्वसामान्य लोक आपल्या आहारात थोडा चेंज म्हणून चिकना पसंती देतात परंतु दरवाढीमुळे सध्या चिकन खाने परवडत नाही त्यामुळे नागरिक माशाकडे वळले आहेत.कोरोना लॉकडाऊनमुळे मच्छीमार्केट सध्या बंद असल्याने मच्छिमार स्थानिक बाजारात 70 ते 80 रुपये दराने चिलापी माशाची विक्री करीत आहेत.
अंडीही महागली
कोरोना संसर्गाच्या काळात डॉक्टर मंडळीकडून चिकन,अंडी खाण्याचा सल्ला दिला जात असल्याने अंड्याचे दरही 30 ते 40 टक्के वाढले आहेत.उन्हाळ्यात कांद्याचे दर उतरतात व हिवाळ्यात वाढतात परंतु यावर्षी मात्र उन्हाळ्यात परिस्थिती उलट झाली आहे.अंड्याचे दर उतरण्याऐवजी ते वाढले आहेत. गेल्या महिन्यात 5 रुपये नगाप्रमाणे अंडी विक्री होत होती परंतु सध्या 7 रुपये दराने अंडी खरेदी करावे लागत आहे तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चिकन व अंड्याचे सेवन केले जात आहे त्यामुळे त्याचे दर वाढले आहेत. विशेष म्हणजे ” संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ” असेच सर्वत्र चित्र दिसत आहे. गावरान अंडी मिळणे मात्र मोठे जिकरीचे झाले आहे जरी ते मिळाले तरी त्याचा दरही 10 रुपये नगावर गेला आहे.यापुढेही अंड्याचे दर वाढतील असे अंडे विक्रेत्यांनी “सकाळ” शी बोलताना सांगितले
कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी बर्ड फ्ल्यूने डोके वर काढल्याने चिकन, अंडी याबाबत अफवा पसरल्या होत्या,या अफवाही कोरोनामुळे संपल्या आहेत.रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शरीराला मोठ्याप्रमाणावर प्रथिनांची गरज असते, अशी प्रथिने अंडी,डाळी,दूध यातून मिळत असल्याने या सर्वांचे दर वाढले आहेत.
” कोरोना संसर्गाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टर मंडळीकडून अंडी खाण्यास सांगितले जात असल्याने अंड्यांना मागणी वाढली आहे परंतु पुरवठा कमी होत असल्याने अंड्याचे दर वाढले आहेत.
-पोपट शेख,अंडी विक्रेते,अंबिजळगाव
“पोल्ट्री धारकाकडून जादा दराने चिकनची खरेदी करावी लागत आहे मध्यंतरी को रोना व बर्ड फ्लूमुळे मालाची कमतरता झाली होती त्यामुळे दर वाढले आहेत.
-जाकिर शेख ,चिकन विक्रेता, अंबिजळगाव