कर्जत : जीवन जगत असताना कोणाला कोणाची गरज केव्हा लागेल हे सांगता येत नाही याचा अनुभव सध्या ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना येत आहे.ग्रामीण भागातून शहरी भागात व्यवसाय, नोकरी , मजुरीसाठी गेलेल्या मतदारांची आता मात्र गावाकडे यावचं लागतय ! असा सूर त्यांच्यापुढे आळवला जात आहे. व मतदानासाठी गावाकडे येण्यासाठी विणवण्याही केल्या जात आहेत.कोरोना प्रादुर्भावाचे सुरुवातीच्या काळात सगळीकडेच भीतीचे वातावरण तयार झाले होते त्यामुळे शहरी भागाकडून मूळगावी येणाऱ्या गावकऱ्याकडे संशयाने पाहिले जात होते तसेच त्यांना आवर्जून गावाकडे येऊ नका असेही बजावले जात होते त्यांना गावबंद करून काही ठिकाणी रस्तेही खोदले जाण्यासारखे प्रकार घडले होते मात्र हे करणारेच आता या शहरी बाबूनाच केवळ मतासाठी साद घालत आहेत व गावी येण्यासाठी विनवण्या करीत आहेत.त्यांना जाण्यायेण्याच्या खर्चाबरोबरच इतर रंगीत-संगीत खर्च करण्याची तयारी त्यांनी केली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना प्रत्येक मतदारापर्यंत उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते मतदान होईपर्यंत ते मतदारांच्या संपर्कात असतात तालुक्याच्या प्रत्येक गावातील मतदार नोकरी-व्यवसाय, मजुरीच्या निमित्ताने पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यात स्थलांतरित झाले आहेत त्यांचा शोध घेऊन मतदानासाठी येण्यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरला जात आहे.
ज्या गावातील मतदार जास्त प्रमाणात बाहेरगावी आहेत त्यांची मात्र पंचाईत झाली आहे. या होणाऱ्या अतिरिक्त खर्चान उमेदवार मात्र
बेजार व घायाळ झाला आहे.
आता जाहीर प्रचार संपला असला तरी, गुप्तप्रचार, देवघेव ,शपथा व जास्तीत जास्त मतदार आणणारा उमेदवाराला जिंकण्याची संधी जास्त असल्याचे दिसून येत आहे.
कर्जत तालुक्यातील 56ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून त्यापैकी 2 ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत तर 54ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार (ता. 15 ) रोजी मतदान होणार आहे व या मतदानाचा निकाल सोमवार (ता. 18 ) रोजी लागणार आहे.त्यामुळे येणारी संक्रांत कोणावर बसणार ? आणि कोणाला पाहणार ? यासाठी 18 तारखेची वाट पाहावी लागणार आहे.
राज्यात सगळीकडेच ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला असताना, कर्जत तालुक्यात दाखल झालेले ऊसतोड मजूरही मतदानासाठी आपल्या गावाकडे जाणार असल्याने ऊसतोडीला मात्र काही अंशी ब्रेक बसणार आहे.
दरम्यान शुक्रवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार यंत्रणा शांततेत पार पडली ,आता मतदानही शांततेत व सखेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावे असे आवाहन कर्जत पोलीस प्रशासनाने केले आहे.
दिलीप अनारसे
Next Post
You might also like