कोव्हिडं केअर सेंटर मध्ये संगीताच्या तालावर धरला कोरोना रुग्णानी धरला ठेका.
कर्जत (प्रतिनिधी) दिलीप अनारसे:-कर्जत येथील कोव्हिडं केअर सेंटर मध्ये असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना सकारात्मक ऊर्जा मिळावी, प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी सर्व सामाजीक संघटनाच्या वतीने संगीतावर व्यायाम सुरु करण्यात आला आहे.
सर्वत्र कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे, कर्जत मध्ये गायकरवाडी व उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील कोव्हिड केअर सेंटर आ रोहित पवार यांनी उभारले असून यामध्ये अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत, सध्या रुग्ण संख्या झपाट्याने वाढतच आहे, अशा काळात विविध उपाययोजना केल्या जात असून अनेक उपक्रम ही राबविले जात आहेत, कर्जत शहरात गेली 210 दिवस श्रमदान करून स्वच्छता करत वृक्षारोपन करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनानी कोव्हिडं केअर सेंटर परिसराची स्वच्छता करणे, विविध दिशादर्शक व सूचना फलक लावणे प्रशासनाला पूरक अशी वेळीवेळी मदत करणे आदी कामे केली असून या सामाजिक संघटनानी संदीप पांढरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली गायकरवाडी कोव्हिडं केअर सेंटर या ठिकाणी सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत संगीतावर डान्स करत व्यायाम करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये अनेक जेष्ठ नागरिक, महिला, युवक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. सकारात्मक ऊर्जा मिळावी, प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे जे कधी करता आले नाही ते मुक्तपणे या ठिकाणी करत आहोत अशी प्रतिक्रिया जेष्ठ नागरिकांनी व महिलांनी व्यक्त केली. यावेळी याप्रसंगी स्वच्छता व वृक्षारोपनाचे महत्व ओळखून त्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा व काम करावे असे आवाहन करताना कोरोना या आजाराला न घाबरता धैर्याने तोंड द्यावे असे आवाहन सामाजिक संघटनाच्या वतीने करण्यात आले, याठिकाणी विविध गाण्यावर कराटे व व्यायामाचे प्रशिक्षक संदीप पांढरकर यांनी सर्वाकडून हसत खेळत डान्स सह व्यायाम करून घेतला.