गुड फ्रायडे म्हणजे काय ? । गुड फ्रायडे माहिती । Good Friday 2021
गुड फ्रायडे म्हणजे काय
गूड फ्रायडे (पवित्र शुक्रवार/चांगला शुक्रवार/काळा शुक्रवार/महा शुक्रवार) हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे. … ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो.
गुड फ्रायडे माहिती
जगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार! प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या प्रेषिताला खरेतर आज क्रुसावर चढविले होते. एवढेच काय ज्या रोमन शिपायांनी त्याला क्रुसावर चढविले होते, त्यांच्यापैकी एकाने स्वत: त्याच्या छातीत भाला भोसकून तो नक्की मृत झाला आहे ना, याची खात्रीही केली होती. (योहान अध्याय 19 वचन 24) तरी या दिवसाला जगभरात ख्रिस्ती लोक शुभ शुक्रवार- गुड फ्रायडे म्हणतात! का बरे. कारण हा दिवस इतिहासातील येशू ख्रिस्ताच्या जीवनातील सत्कथेच्या परमोच्च बिंदूकडे घेऊन जातो. या दिवशी येशू ख्रिस्तापूर्वी होऊन गेलेल्या अनेक संदेष्टय़ांनी वर्तवलेली येशूविषयीची सर्वात महत्त्वाची भविष्यणी पूर्ण झाली होती. कोणतीही चूक, कोणतेही पाप न केलेल्या परमेश्वराच्या पुत्राला माणसांनी सुळावर चढविले. मग हा शुक्रवार शुभ कसा? त्याचे उत्तर बायबलच्या नव करारातील चार शुभवर्तमानात आहे.
Good Friday 2021
२ एप्रिल २०२१