जिल्हा बँकेच्या संचालक पदी अंबादास पिसाळ यांची निवड Selection of Ambadas Pisal as Director, District Bank

Selection of Ambadas Pisal as Director, District Bank

 जिल्हा बँकेच्या कर्जत तालुका सोसायटी मतदारसंघातून विखे यांचे कट्टर समर्थक अंबादास पिसाळ एका मताने विजयी झाले आहेत. कर्जत सोसायटी मतदार संघाची लढत मीनाक्षी साळुंके व अंबादास पिसाळ या दोन्ही विद्यमान संचालकांमध्ये झाली. कर्जत सोसायटी मतदारसंघाच्या ७४ मतदारांपैकी ७३ जणांनी मतदान केले होते. मतमोजणीमध्ये अंबादास पिसाळ अवघ्या एका मताने विजयी झालेले आहेत. यामध्ये थोरात समर्थक साळुंके यांचा पराभव झाला.

पिसाळ हे विजयी झाल्याची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. यामध्ये युवा नेते दादासाहेब सोनमाळी, डॉ. संदीप बरबडे, बंटी यादव आदींचा समावेश होता. विजयानंतर पिसाळ यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेतली. पिसाळ यांचा ठिकठिकाणी सत्कार केला जात आहे.

अंबादास पिसाळ अनेक दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. ते विखे यांचे अत्यंत निकटवर्ती व कट्टर समर्थक राहिलेले आहेत. त्यांना आपल्या निष्ठेचे वेळोवेळी फळ मिळालेले आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य, जगदंबा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. सहकार क्षेत्रात यांचे विशेष योगदान आहे.

४० सदस्य सहलीवर नेल्याने साळुंके यांचे पारडे जड वाटत होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना फक्त ३६ मते पडली. हा पराभव काँग्रेससाठी जिव्हारी लागणारा ठरला आहे. विखे गटाची सरशी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. या निवडीने कर्जतमध्ये भाजपाने काँग्रेसला चांगलाच दणका दिला आहे.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy