दहा महिन्यानंतर… स्कूल चले हम ! ! शाळांची घंटा वाजली Karjat News
कर्जत ता.२८ कोरोना महामारीच्या प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इयत्ता पाचवी इयत्ता आठवीच्या शाळा बुधवार (ता. 27) पासून सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवल्याने कोरोना नियमांचे पालन करीत कर्जत तालुक्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा आज बुधवार (ता. 27) पासून सुरू झाल्या आहेत.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिल्यानंतर ठाकरे यांनी कोरोना यासंदर्भातील सर्व उपाययोजना अमलात आणून व सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते यापूर्वी 23 नोव्हेंबर पासून इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यात आले होते त्याला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवी वर्ग देखील प्रत्यक्षात सुरू झाले आहेत दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर व मोठ्या सुट्टीनंतर विद्यार्थी आपले वर्ग मित्र मैत्रिणी आणि शिक्षकांना भेटली आहेत.
कर्जत तालुक्यात व ग्रामीण भागातील न्यु इंग्लिश स्कूल विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्गसुरू झाले असून सुरुवातीला विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना देऊन त्याचे पालन करण्याचे सांगण्यात आले. विद्यालयात ६०० विद्यार्थी संख्या असून त्यापैकी पहिल्याच दिवशी १३०विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुशी व उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.काही पालकही विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी शाळेत आले होते.
शैक्षणिक ऋतुचक्र मात्र बदलले
पाऊस लांबला की, शेती हंगामाचे संपूर्ण वर्षाचे गणित बिघडते तसाच प्रकार कोरोना महामारीच्या संकटामुळे शैक्षणिक ऋतुचक्र वरही झाला आहे.दरवर्षी फेब्रुवारीमध्ये होणारी बारावीची परीक्षा यावर्षी 23 एप्रिल रोजी तर दहावीची मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणारी परीक्षा 29 एप्रिलला सुरु होणार असल्याने या परीक्षांचे निकालही त्यामुळे लांबणीवर पडणार आहेत.कोरोनामुळे नव्या वर्षातील शैक्षणिक ऋतुचक्र अशाप्रकारे बदललेले दिसेल.
दरम्यान नंतर शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्याने शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजलेला असल्याचे यावेळी दिसून आले.
“शालेय शिक्षण विभागाकडून ज्याप्रमाणे सूचना येतील त्याप्रमाणे त्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच हळूहळू वाढवून शाळा पूर्ववत सुरू होतील”.
–एच डी, गाढवे प्राचार्य. न्यु इंग्लिश स्कुल अंबिजळगाव
” दहा महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आज शाळा सुरू झाल्याने वर्ग मित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंद झाला.आता विद्यार्थी व शिक्षकांचा पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष संवाद सुरू होईल”.
–रुतुजा छञगुन अनारसे,विद्यार्थिनी,