दुःखद घटना । Nashik Oxygen Tank Leakage Live। २२ रुग्णांचा मृत्यू
नाशिक महापालिकेच्या जाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती होऊन तब्बल २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळं नाशिक हादरले आहे. राज्य सरकारनं या दुर्घटनेची तात्काळ दखल घेतली असून स्थानिक प्रशासनला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. मदत व बचावकार्य तातडीनं हाती घेण्यात आलं आहे.