पत्रकार श्री. धनराज पवार यांची स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या जामखेड तालुका अध्यक्ष पदी निवड
कर्जत- जामखेड प्रतिनिधी -दिलीप अनारसे – पत्रकार श्री. धनराज पवार यांचे जामखेड तालुका अध्यक्षपदी निवड झाली.
श्री धनराज पवार यांचा राजकीय व भौगोलिक अभ्यास तसेच युवा पत्रकार म्हणून ते सतत हजरजवाबी व स्पष्टवक्तेपणा या गुणांमुळे स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री नामदेव शेलार यांनी त्यांच्यावर जामखेड तालुक्याची जबाबदारी सोपवली आहे.
स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या वतीने समाजातील वंचित, शोषित, मागास घटकांना न्याय मिळावा तसेच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावे म्हणून पत्रकार श्री.धनराज पवार यांना निवडीचे पत्र देऊन जामखेड तालुका अध्यक्ष पदी निवड केली तसेच संपूर्ण जामखेड तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.