पर्यावरण रक्षणासाठी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचा इकोफ्रेंडली टुथब्रश उपक्रम
![]() |
Karjat |
रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी इकोफ्रेंडली टुथब्रश उपक्रम हाती घेण्यात आला आहे.अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष रो.विशाल मेहेत्रे यांनी दिली.
कर्जत शहरात सुरू असलेले स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियान या उपक्रमाला पूरक असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत आपल्या घरात असलेला जुना टुथब्रश कचरा म्हणून फेकून न देता ते रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटिच्या सदस्यांना संपर्क करून त्यांच्याकडे द्यावेत व त्याच्या बदल्यात नविन इकोफ्रेंडली बांबुपासून बनवलेले टुथब्रश घेऊन जावेत.
दरवर्षी प्लास्टिकपासून बनलेले लाखो टुथब्रश नदीमध्ये किंवा गटारीमध्ये अडकून बसतात व ते कित्येक वर्षे तिथेच पडून रहातात.परिणामी त्याचा पर्यावरणाला धोका होतो.कित्येक वेळा हे टुथब्रश जनावरांच्या पोटात जातात.म्हणून हे प्लास्टिकपासून बनलेले टुथब्रश इतरत्र कुठेही फेकुन न देता ते रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटिच्या वितरण केंद्रावर आणून द्यावेत व नविन इकोफ्रेंडली बांबुपासून बनवलेला टुथब्रश घेऊन जावा.
जुना प्लास्टीकचा टुथब्रश प्रत्येकी चार रुपये किंमतीला घेतला जाईल व नविन इकोफ्रेंडली बांबुपासून बनवलेला टुथब्रश प्रत्येकी पन्नास रुपयास मिळेल .
वितरण केंद्र-परिवार एजन्सी,धन्वंतरी मेडिकल, अनुष्का मेडिकल,अक्षय मेडिकल,स्मिता मेडिकल, समर्थ किराणा स्टोअर्स,श्रीराम मेडिकल, संकेत इलेक्ट्रिकल, विवेकानंद पुस्तकालय येथे इकोफ्रेंडली टुथब्रश मिळतील.
या उपक्रमासाठी प्रोजेक्ट चेअरमन रो.गजानन चावरे,रो.राहुल खराडे,रो.ओंकार तोटे व सर्व रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले.