पिंपरी चिंचवड पोलीस भरती पेपर ,तारीख वेळ जाहीर ! नक्की कधी होणार ?
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ७२० पदांसाठी शनिवार, दि. २३ ऑक्टोबरला ऑफलाईन लेखी परीक्षा होणार आहे. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी यांनी दिली. परीक्षा प्रलंबित राहिल्याने अर्जदार उमेदवारांना प्रतीक्षा होती. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी (दि. ४) सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. (Maharashtra Police Recruitment 2021)
लेखी परीक्षेची तारीख,
वेळ शनिवार, दि. २३ ऑक्टोबर, वेळ दुपारी : ३ वाजता
आयुक्तालयात भरण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई पदाच्या जागा
सर्वसाधारण – १७६ महिला – २१६ खेळाडू – ३८ प्रकल्पग्रस्त – ३८ भूकंपग्रस्त – १४ माजी सैनिक – १०७ अंशकालीन पदवीधर – ७१ पोलीस पाल्य – २२ गृहरक्षक दल – ३८
( लोकमत )