[पुणे शहराची माहिती ] Pune city information

[पुणे शहराची माहिती ] Pune city information
Pune City 

पुणे शहराची माहिती 

हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोईसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या पुणं या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते,इंग्रजांनी केलेला अपभ्रंश. पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखतात.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{संदर्भ हवा}.या शहराचे जुने नाव पुनवडी ऊर्फ पूर्वणी असे होते.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले हे शहर आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची’सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. 

पुणे शहर नकाशा

पुणे शहर माहिती

पुणे हे नाव इ.स.८ व्या शतकात ‘पुन्नक’ (किंवा ‘पुण्यक’) नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात ते ‘कसबे पुणे’ किंवा ‘पुनवडी’ नावाने ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव ‘पुणे’ , आणि बोलीभाषेत ’पुणं’ असे वापरले जात होते. त्यामुळे ब्रिटिशांनी ’पुणं’चे स्पेलिंग Poona असे केले. त्यावरून परप्रांतीय लोक पुण्याला ‘पूना’ असे संबोधू लागले. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंग Pune असे केले. तरीही पूर्वीपासूनच हे शहर पुणे याच मराठी अधिकृत नावाने ओळखले जात होते.  काहीजण पुण्याला पुण्यनगरी असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून किंवा महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची’सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखली जाते किंवा ओळखले जाते.  पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ’मुहियाबाद’ नाव दिले होते. पण प्रत्यक्ष पत्रव्यवहारात तो या शहराचा उल्लेख ’शहर नमुना’ असा करीत असे. पुणे येथील शनिवार वाडा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. त्यामुळे अनेक शहरातील लोक शनिवारवाड्याला भेट द्यायला येतात.

पुणे शहर

तुशृंगी मंदिर,महादजी शिंद्याची छत्री इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.सर्वांनी भेट द्यावीत अशी ठिकाणे आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy