पोलीस भरती माहिती – Police Recruitment Information Marathi

 

पोलीस भरती माहिती 2021 [Police Recruitment Information 2021]
Police Recruitment Information Marathi

पोलीस भरती माहिती 2021 [Police Recruitment Information 2021]

पोलीस भरती कागदपत्रे [Police recruitment documents]

  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
  • ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र

पोलीस भरती ट्रेनिंग [Police Recruitment Training]

मैदानी चाचणी – प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास धावणे 100 मीटर, 400 मीटर, 800 मीटर, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, अडथळयांची शर्यत, स्टॅडिंग रोप, मंकी रोप, रस्सी चढणे (रॅपलींग) सॅटिअप्स, पुलअप्स, चिनअप, पद कवायत, रायफल फायरिंग, ट्रेडिंग सुविधा उपलब्ध असल्यास पोहणे इत्यादी विषयांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येईल. अन्य प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यास अग्निशमन रोड टॅफिक ट्रेनिंग, प्रथमोपचार स्वास्थ्य शिक्षा वायरलेस कम्युनिकेशन, व्यक्तिमत्व विकास ,आपत्ती निवारण व्यवस्थापन, वाद्यवृंद प्रशिक्षण याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात येईल.

पोलीस भरतीसाठी पात्रता [Eligibility for Police Recruitment]

महाराष्ट्र पोलीस भरती होण्यासाठी इयत्ता बारावी पास असावा, रहिवासी दाखला, सेवा योजना कार्यालयातंर्गत नांव नोंदणी दाखला व ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील 

पोलीस भरती निवड प्रक्रिया [Police recruitment selection process]

पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण [Police Peon Recruitment Exam Training] देण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करुन इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविण्यात यावेत. शासनमान्या नोंदणीकृत, नामांकित आणि अनुभवी शैक्षणिक संस्था (मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालये) आणि प्रशिक्षण संस्था यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जामधून प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात यावी. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणा दरम्यान रुपये 1500/- प्रतिमाह प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल., निवडलेल्या प्रशिक्षण संस्थेस प्रशिक्षणार्थींना द्यावयाचे वाचन साहित्य आणि प्रशासकीय बाबींसाठी संस्थेस प्रती प्रशिक्षणार्थी रुपये 300/- प्रमाणे अनुदान देण्यात येईल, निवडलेल्या प्रशिक्षण संस्थेस प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याकरिता सामान्यज्ञान, मराठी भाषा आणि शारिरीक क्षमता हे विषय शिकविण्याकरिता दोन प्रशिक्षकांसाठी प्रतिमाह एकूण रुपये 30 हजार प्रमाणे दोन महिन्यांसाठी 60 हजार रुपये एवढे माधन देण्यात येईल, निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षण दरम्यान चहापान व अल्पोहार देण्यासाठी होणा-या खर्चापोटी रुपये 15/- प्रतीदिन प्रती प्रशिक्षणार्थी एवढे प्रशिक्षण संस्थेस देण्यात येईल, गणवेश साहित्यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीस 1 हजार रुपये, प्रशिक्षण दरम्यान चहापान व अल्पोपहार देण्यासाठी होणा-या खर्चापोटी रुपये 15 प्रतीदिन, प्रती प्रशिक्षणार्थी एवढे अनुदान प्रशिक्षण संस्थेस देण्यात येईल.  तरी अधिकाधिक अल्पसंख्यांक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
( विकासपीडिया )



You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy