प्रजासत्ताक दिन संचलना मध्ये महाराष्ट्रातील छात्र सैनिकांची उत्कृष्ट कामगिरी
राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्राच्या पथकाने प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलन व दिल्लीतील शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करून मानाच्या प्रधानमंत्री बॅनरचे उपविजेतेपद मिळविल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अभिनंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.