प्रसूती होताना ओरडते म्हणून ,महिलेला डॉक्टरकडून मारहाण , दौंडमधील धक्क्कादायक घटना

 

 पुण्यातील दौंड तालुक्यातून (From Daund taluka of Pune) धक्कादायक घटना घडली आहे टीव्ही ९ मराठी ने दिलेल्या रिपोर्ट नुसार . प्रसुतीवेळी महिलेला त्रास होत असल्याने तिने आरडाओरड केली म्हणून डॉक्टरने गरोदर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात डॉक्टरविरोधात संताप व्यक्त केला जातोय.   प्रसूती कळा येत असल्याने रुग्णालयात भरती झालेल्या एका महिलेस डॉक्टरकडूनच अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक दौंड तालुक्यातील यवत येथे घडलीय. याबाबत यवत पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसूती कळा येत असल्याने महिला यवत येथील जयवंत हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी या महिलेस तोंडावर, डोक्यावर, हातावर, मांडीवर, ओठांवर चापटीने आणि बुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  ही मारहाण इतकी अमानुष होती की या मारहाणीमुळे पूजा दळवी यांच्या डोळ्याच्या खाली चेहऱ्यावर काळे-निळे रंगाच्या जखमा झाल्या आहेत.  कहर म्हणजे मारहाण करुन डॉक्टर महिलेला मी कसा बरोबर आहे, मला नेमकं कशामुळे मारावं लागलं, मारल्यामुळे तू ओरडायची कशी थांबली, हे निर्लजपणे सांगत होता. डॉक्टर खरं तर देव मानले जातात. पण या डॉक्टरने वैद्यकीय पेशाला काळीमा फासला आहे.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy