प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने – Tools of the history of ancient India

प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने  (Tools of the history of ancient India)

आलेख – शिलालेख, स्तंभलेख, गुहालेख, ताम्रपट यावरून आपल्याला प्राचीन इतिहासाची ओळख होते.

वाङ्मयीन साधने – यात धर्मग्रंथ, इतर वाङ्मय तसेच परदेशी प्रवाशांची प्रवासवृत्ते यांवरून आपल्याला बरीच माहिती मिळते.
प्रागतिहासिक कालखंड – हा कालखंड खूप मोठा होता. हा मानवी इतिहासाचा सुरूवातीचा कालखंड आहे. या कालखंडाला ‘अश्मयुग’ असेही संबोधले जाते. 

वजन आणि मापे :- उत्खननात जे वजन व मापे आढळली आहेत, त्यावरून व्यापारासंबंधी कल्पना येते

कृषी जीवन :- शेती हा व्यवसाय हडप्पा संस्कृतीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. हडप्पा संस्कृतीतील लोक लाकडी नांगरांचा वापर करीत असत. पण नांगरांचे ओढणे बलामार्फत किंवा माणसामार्फत होत असेल, याचे आकलन होत नाही. येथील लोक गहू, बार्ली, वाटाणा, तीळ, मोहरी या पिकांचे उत्पादन घेत असत. हे धान्य मोहोंजोदरो, हडप्पा तसेच कालीबंगन येथील धान्य कोठारात साठवले जात असावे. उत्खननात सापडलेल्या अनेक मृदांवर प्राण्यांचे चित्र आहे. गाय, म्हैस, हत्ती, डुक्कर, मांजर, कुत्रा, ससा, माकड, हरीण, मोरांचे पालन हे लोक करीत असत. 



You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy