फास्ट टॅग म्हणजे काय, फास्टॅग कसा आणि कुठे मिळेल?

 



देशातल्या सगळ्या राष्ट्रीय महामार्गांवर भरला जाणारा टोल हा 1 डिसेंबर 2019 नंतर फास्टॅगद्वारे भरण्यात यावा, असं वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटलं होतं . पण आता ही मुदत वाढवून आता हि मुदत आणखी  महिने वाढवण्यात आली आहे .

फास्ट टॅग म्हणजे काय, फास्टॅग कसा आणि कुठे मिळेल?

फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर असतो जो तुमच्या गाडीच्या पुढील  लावला जातो. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी – RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते .रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होईल.सध्या रोख पैसे देऊन वा कॅशलेस अशा दोन्ही पद्धतींनी टोल भरता येत आहे .

fastag Website – http://www.fastag.org/

कुठे मिळेल फास्टटॅग?

बँका, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासारख्या ठिकाणी फास्टॅगच्या विक्रीसाठी  28,500 विक्री केंद्र उभारण्यात आली आहेत. यासोबतच आरटीओ (RTO) कार्यालय, सर्व सेवा केंद्र, वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवरही हे फास्टॅग मिळू शकतात . लोकांना फास्टॅग मोफत देण्यात यावेत अशा सूचना केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या आहेत. कार, जीप्स आणि व्हॅनसाठीचे फास्टॅग हे अॅमेझॉन, पेटीएम, स्टेट बँक, ICICI बँक, अॅक्सिस बँक, HDFC बँक, IDFC फर्स्ट बँक यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईनही विकत घेता येतील.

फास्टॅग घेण्यासाठी तुम्हाला हि कागदपत्रे लागतील 

  1. गाडीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट 
  2. पॅन कार्ड 
  3. व्होटर आयडी 
  4. आधार कार्ड 



You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy