बिटकेवाडीत नेञ तपासणीस उत्स्फूर्त प्रतिसाद
जन आधार सेवाभावी संस्था बिटकेवाडी व केतन पांडुळे( सरपंच वालवड) यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
बिटकेवाडी येथे जन आधार सेवाभावी संस्था यांच्या उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या शीबिबरास बिटकेवाडी,माळेवाडी,शिंदा,
चखालेवाडी परीसराती रुग्णांनी मोठ्या प्रमाणात प्रतीसाद दिला.
उद्घाटन प्रसंगी प्रविण पिंपळे (प्रहार संघटना ता.अध्यक्ष नगर) देविदास बिटके (मा. सरपंच), अंकुश बिटके (मा. सरपंच) डॉ. भोस, सोपान बिटके (ग्रामपंचायत सदस्य)अशोक माळशिकारे (प्रहार ता.अध्यक्ष श्रीगोंदा),सांगळे सर,ज्ञानेश्वर मिंड, सुभाष पवार
झुंबरं बिटके व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
जन आधार सेवाभावी संस्था बिटकेवाडीचे संस्थापक अध्यक्ष कल्याण मिंड म्हणाले की ही एक संस्था माझी नसुन ती सर्व अंध अपंग दीन दुबळा वंचित घटकांना न्याय देण्यासाठी तयार केलेली आपली संस्था आहे.
केतन पांडुळे (सरपंच वालवड) कल्याण मिंड,(अध्यक्ष जन आधार सेवाभावी संस्था) बाबासाहेब बिटके ( सदस्य) योगेश सांगळे राहुल शिपकुले, गणेश पवार ,उषा बिटके ,रेखा धावडे (उपाध्यक्ष)यांनी सर्वांचे आभार मानले.