बोठे यांना अटक करणाऱ्या पथकामध्ये कर्जत चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा समावेश Karjat police inspector Chandrasekhar Yadav was among the team that arrested Bothe
रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे हे 90 दिवसांपासून फरार होते त्यांना पकडणे हे संपूर्ण पोलीस पोलीस विभागाला आव्हान होते .
बाळ बोठे यांना शोधण्यासाठी पोलीस आहोरात्र त्यांच्या मागावर होते मात्र त्यांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता मात्र अखेर कर्जत येथील पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव ज्यांनी राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक फरारी गुन्हेगारांना पकडले होते त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली व त्यांनी ती सार्थ ठरवताना चंद्रशेखर यादव व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश सानप यांनी हैदराबाद येथे हॉटेलमध्ये बाळ बोठे यांना पकडले या पथकामध्ये कर्जत पोलिस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.