भरोसा सेलचे उद्घाटन व पोलिसांना दिलेल्या वाहनांचे हस्तांतरण ही प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.
कर्जत (प्रतिनिधी) –२६– दिलीप अनारसे:-कर्जत- महाराष्ट्रात तालुकास्तरिय कुठे ही नसलेला भरोसा सेलचे उद्घाटन कर्जत येथे करण्यात आले व पोलिसांना दिलेल्या वाहनांचे हस्तांतरण ही प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.
कर्जत येथील पोलीस स्टेशन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये आ. रोहित पवार यांच्या मदतीने तालुकास्तरावरील पहिल्या भरोसासेलचे उद्घाटन आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सौ. सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आले तर पोलीस ताफ्यात देण्यात आलेल्या दोन दुचाकी व एक चार चाकी गाड्याच्या चाव्या देऊन कर्जत पोलिसांना सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी भरोसा सेलबाबत माहिती देऊन आपण कार्यभार स्वीकारल्यापासून केलेल्या कामकाजाची माहिती दिली. याप्रसंगी नगरसेविका राखी शहा, नगराध्यक्षा प्रतिभा भैलूमे, सभापती सौ अश्विनी कानगुडे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांंनी बोलताना आ रोहीत पवार याचे कौतुक करताना त्यांनी पोलिसांवर विश्वास ठेवणारे वातावरण निर्माण केले, व तालुकास्तरा वरील राज्यात कोठेही नसणारे पहिले भरोसा सेल कर्जतमध्ये स्थापन करण्यास मदत केल्याबद्दल धन्यवाद दिले, समाजाला प्रगत व सुधारणावादि निर्माण करण्यासाठी प्रत्येक अत्याचारित मुलीने महिलेने तक्रार ही केलीच पाहिजे, यासाठी समाजाने अशा मुलींना ताकद दिली पाहिजे, भरोसा सेल मध्ये विविध विभागाचा सहभाग आहे, पोलीस ही सेवा देणारी यंत्रणा आहे जशी आवश्यकता असेल तसे काम केले जाईल, महिला सिंघम कर्मचारी रस्तावर येणार असून आता त्रास देणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी अन्यथा त्यांना जेलची हवा खावी लागेल, कौटुंबिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्या ऐवजी अगोदर समुपदेशन केले जाते असे सांगत आपल्या पोलिसांकडून ज्या अपेक्षा वाढल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे म्हटले. आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सौ सुनंदा पवार, याांनी बोलताना मुलीनात्रास होत असेल ते पोलिसांना तातडीने पोहचण्यासाठी या गाड्या दिल्या सासू नका कणखर बना भरोसा सेल वर विश्वास ठेवा महिला मुली व जेष्ठ नागरिकांसाठी नक्कीच याचा उपयोग होईल. पोलीस विभागाचा आदर आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणी किती वाजता कसे कपडे घालता हे मुलींनी महिलानी समजून घेतले तर 50 टक्के अत्याचार कमी होतील. तुमचं कणखर बननं खूप आवश्यक आहे. मुलगी समाजापेक्षा घरात सक्षम नाहीये यासाठी मुलीच्या आईने अत्यंत समजून उमजून काम करण्याची गरज आहे. तालुक्याला अत्यंत चांगले अधिकारी आ रोहित पवार यांनी निवडून आनले आहेत, अधिकारी निर्णय घेत असतात त्यामुळे त्या सर्वांना मदत करा असे म्हणत स्वच्छता अभियानात काम करणारे श्रमप्रेमी, स्वच्छताप्रेमी व पत्रकाराचे कौतुक केले.
या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, डॉ सुचेता यादव, तहसीलदार नानासाहेब आगळे, गट विकास अधिकारी अमोल जाधव, प्राचार्य डॉ बाळ कांबळे, मुख्याधिकारी गोविंद जाधव, डॉ संदीप पुुंड, श्रीगोंदा सभापती गीतांजली पाडळे, जामखेडच्या सभापती राजश्री मोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, पोलीस निरीक्षक जामखेड संभाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक बेलवंडी अरविंद माने या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाश्रीगोंदा पो. नी. रामराव डिकले यांनी आभार मानले. या प्रसंगी मोठ्या संख्येने नगरसेविका, महिला महाविद्यालयीन, मुली, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, व अनेक जण उपस्थित होते.