मतदारसंघात फिरायला रोहित पवारांना पोलीस बंदोबस्त कशासाठी – दादासाहेब सोनमाळी
नव्या पर्वाची आगळी वेगळी सुरुवात ऐन दिवाळीच्या तोंडावर रोहीत्रांचा विज पुरवठा खंडित केला आहे, यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. सर्व वीजपुरवठा सुरळीत करावा, वीज बिल भरायचे की दिवाळी साजरी करायची असा प्रश्न कर्जत तालुक्यातील जनतेला पडला आहे. खंडीत वीज पुरवठयामुळे तर लोक प्रतिनिधी पोलीस बंदोबस्तात फिरत नाहीत ना असा सवाल भाजपचे युवा नेते दादासाहेब सोनमाळी यांनी उपस्थित केला आहे., गेल्या दोन वर्षांत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Karjat Jamkhed MLA Rohit Pawar) यांनी मतदारसंघातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर विविकास कामे केली आहेत. असा गवगवा ते सोशल मीडियात करत आहेत. मग ते किंवा त्यांचे नातेवाईक यांना कर्जत जामखेड मतदारसंघात फिरताना पोलीस बंदोबस्त कशासाठी लागतो ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्जत तालुक्यातील शेती पंप व घरगुती कनेक्शन असलेल्या अनेक रोहीत्रांचा वीज पुरवठा महावीतरणने कट केला आहे. वीज बिल भरणा केला तरच वीज कनेक्शन जोडाता येईल असे अधिकारी स्पष्टपणे सांगत आहेत. यामुळे विहिरीत पाणी असून ते पिकांना देता येत नाही यामुळे पिके जळू लागली आहेत. दिवाळी करायची की बिल भरायची अशा दुहेरी समस्येमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. आमदार रोहित पवार व त्यांचे नातेवाईक मतदारसंघात आले की पोलिस बंदोबस्त बरोबर असतो तेच पोलीस बळ विविध प्रलंबित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वापरले तर अनेक घटनांचे तपास लागतील. कर्जत शहरातील आडत व्यापारी रविंद्र कोठारी यांची दहा लाख रुपयांची चोरी भर दिवसा झाली. कर्जत शहरातील व्यापारी बांधवांनी पोलिसांना निवेदन देऊन चोरांची नावे दिली मात्र महिना झाला या घटनेचा तपास अद्याप लागला नाही. कर्जत शहरासह तालुक्यातील अनेक भागात भर दिवसा चोरया होत आहेत.
अनेक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. असे असताना सर्व काही अलबेल आहे असे आभासी चित्र उभे केले जात आहे. गेली दोन वर्षे विकास कामाची पद्धत पाहीली आमदार रोहित पवार यांनी आता पर्यन्त एकही मोठे काम केले नाही. भिंती, सोशल मीडिया व कागदावरच सध्या विकास चालू आहे. पुर्वी मंजूर झालेली कामे सध्या सुरू आहेत. ती कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. याला जबाबदार कोण असा सवाल भाजपचे नेते दादासाहेब सोनमाळी यांनी उपस्थित केला आहे. एकंदरीत सध्या तरी लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार अशी स्थिती निर्माण झाली आहे. येत्या सहा महिन्यांत माजी मंत्री राम शिंदे (Maaji Minister Ram Shinde) यांचे डोळे पांढरे होतील असे आपण म्हणाला होतात, तुम्हीच पोलीस बंदोबस्त घेऊन फिरतात आपल्या कार्यपद्धतीमुळे जनतेचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. कर्जत तालुक्यातील प्रांत अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे शासकीय नोकर आहेत की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख तालुक्याच्या दौऱ्यावर येतात तेंव्हा हे उपस्थित नसतात मात्र आमदार किंवा त्यांचे नातेवाईक आले आले तर हे सर्व जण हजर असतात ही वस्तुस्थिती आहे. माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून अहमदनगर सोलापूर महामार्गाचे काम मंजूर झाले. नुकसान भरपाई साठी मोठ्य प्रमाणावर निधी उपलब्ध झाला मात्र यामध्ये अनेक ठिकाणी काळंबेरं झाले आहे. याबाबत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या गेल्या आहेत तत्कालीन प्रांत अधिकारी अर्चना नष्टे यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कारभाराची चौकशी करावी अशी मागणी दादासाहेब सोनमाळी यांनी केली आहे.