मतमोजणी नंतर झालेला कचरा विविध सामाजिक संघटनानी श्रमदान करून स्वच्छ केला karjat news
कर्जत (प्रतिनिधी) दिलीप अनारसे :-कर्जत तालुक्यातील 54 ग्रामपंचायतीच्या मतमोजणी नंतर झालेला कचरा विविध सामाजिक संघटनानी श्रमदान करून स्वच्छ केला, आज श्रमदानातून स्वच्छतेचा सलग 110 वा दिवस होता.
कर्जत तालुक्यात स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 व माझी वसुंधरा अंतर्गत विविध सामाजिक संघटनानी एकत्र येत श्रमदानातून स्वच्छतेचा अभिनव मार्ग निवडला गेली साडे तीन महिन्यापासून अविरत खंड पडू न देता स्वच्छ कर्जत अभियान सुरू ठेवले आहे. यामुळे या कर्जत शहरात वर्षानुवर्षे पडलेला अनेक ठिकाणचे कचऱ्याचे ढीग बाहेर काढले गेले आहेत. दि 18 जाने रोजी कर्जत शहरात तालुक्यातील 54 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी होती यासाठी तालुक्यातून हजारो लोक शहरात आले होते या तील काही लोकांनी पाण्याच्या बाटल्या, गुटख्याची रॅपर, तंबाखूच्या पुड्या, चिप्सची पाकिटे, कागद, अशा अनेक प्रकारचा कचरा जुन्या तहसीलच्या दारात टाकला होता.
यामुळे स्वच्छ केलेले कर्जत शहर अस्वच्छ झाले होते, विविध सामाजिक संघटनानी ही बाब लक्षात घेऊन मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी दि 19 जाने रोजी या भागात येऊन श्रमदान केले व परिसर स्वच्छ केला. यानंतर सर्वानी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. नागरिकांनी स्वच्छता अँप डाउनलोड करावे व त्यावरून थेट कचऱ्या संदर्भात तक्रार करावी, माझी वसुंधरा या वेबसाईट वरून वैयक्तिक शपथ घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
दर मंगळवारी कर्जत शहरात नो व्हेईकल डे घोषित केले करण्यात आलेला असून आज श्रमदान करण्यासाठी येणारी सर्व श्रमप्रेमी सायकल वरच आले होते, या सर्वानी कर्जत शहरात सायकल वरून रॅली काढत जनजागृती केली व लोकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा व आठवड्यात कमीत कमी एक दिवस तरी इंधन चे वाहन वापरू नये असे आवाहन केले जात आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.