मनसे सदस्य नोंदणी अभियानामध्ये आतापर्यंत किती जणांनी घेतलंऑनलाईन सदस्यत्त्व mns nondani. in
mnsnondani.com वर सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. मनसेच्या या प्रयत्नाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती मनसेचे नेते, सरचिटणीस शिरीष सावंत यांनी दिली आहे.
शिरिष सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ते 17 मार्च दरम्यान ऑनलाईन माध्यमातून झालेल्या मनसे सदस्य नोंदणी चा आकडा हा अंदाजे साडे तीन लाखांच्या घरामध्ये आहे. अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक मनसे सदस्य नोंदणी अभियानाला प्रतिसाद मुंबई मधून मिळाला आहे. तर अजून पुढील 15 दिवस हे मनसेचे सदस्य नोंदणी अभियान ऑनलाईन पद्धतीने सुरु राहणार आहे. राज्यात ऑनलाईन सोबत ऑफलाईन देखील सदस्य नोंदणी सुरू आहे. त्याचा आकडा देखील येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.