महत्वाचे: कर्जत पोलिसांचे भावनिक आवाहन Emotional appeal of Karjat police

 

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे भावनिक आवाहन_

      ‘संवाद वाढवा, जास्तीत जास्त मित्र वाढवा, आपल्या अडचणी आपले नातेवाईक,मित्र यांच्याशी मोकळेपणाने मांडा,पोलिसांना सांगा.कर्जत पोलीस तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध आहेत.निराशेचा थोडा कालावधी असतो, तो गेल्यावर सर्वकाही व्यवस्थित होते.जीवन संपवण्याचा क्रुर विचार मनातही आणू नका,नागरिकांनो तुम्हाला विनंती, तुम्ही आत्महत्या करू नका’

        असे भावनिक आवाहन कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

        गेली पंधरा दिवसांच्या कालावधीत कर्जत तालुक्यातील विविध भागात घडलेल्या आत्महत्येच्या अनेक घटनांनी समाजमन खिन्न झाले आहे.संबंध तालुक्यालाच नव्हे तर कर्जतच्या पोलिस प्रशासनाकडुनही याबाबत हळहळ व्यक्त होत आहे.अनेक कारणांवरून नैराश्यातून वैयक्तिक आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असुन आता सामुहिक आत्महत्या करण्याचे प्रकारही चिंतेची बाब बनली आहे.सध्या गुन्हेगारी रोखण्यासाठी कर्जत पोलिसांकडून प्रभावीपणे उपाययोजना राबवल्या जात आहेत.काही आत्महत्येची कारणे समोर आणण्यासाठी पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात.मात्र आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना पोलिस यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांच्याशी चर्चा विनिमय केल्यास आत्महत्या मोठ्या प्रमाणात रोखल्या जातील.यासाठी कर्जत पोलिसांकडुन आत्महत्येच्या घटनांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.आत्महत्या करण्यात आलेल्या कुटुंबाची होणारी वाताहात, कुटुंबातील सदस्यांना जगावे लागणारे तणावातील जीवन यामुळे संपुर्ण कुटुंबाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. क्षुल्लक कारणावरून होत असलेल्या आत्महत्या देखील चिंतेची बाब आहे. मध्यस्ती किंवा संबंधित व्यक्तींचे मानसिक परिवर्तन करून या आत्महत्यांना आळा बसू शकतो.पोलिस हे आपले मित्र आहेत असे समजुन त्यांना आपल्या अडचणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे काळविण्याचे आवाहनही यादव यांनी केले आहे.

*फोन करा,मेसेज करा तात्काळ मदत करता येईल!*

        ‘कोण काय म्हणेल?त्यांना काय वाटेल?आपली अवहेलना होईल का?असे विचार मनात न आणता आपल्या घरातील माणुस म्हणुन मला सांगा किंवा कर्जतच्या कोणत्याही पोलिसांना सांगा.आत्महत्या उपाय नाही,चर्चेतुन मार्ग निघतोच असे विचार प्रत्येकाने मनामध्ये प्रखर करावेत असेही मत पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy