महाराष्ट्र पोलीस भरती | पोलीस भरती माहिती 2021 । Police Recruitment Information 2021

 विद्यार्थी मित्रांनो

तुम्ही जीवनाच्या अत्यंत महत्वाच्या वळणावर आहेत, प्रथमच तुम्ही भावी करिअर निवडीसंबंधी निर्णय घेणार आहात.

पोलीस भरती माहिती 2021

मी तुम्हाला प्रथम बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करतो.

तुम्ही आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा आणि मग तुम्ही भविष्यात उत्तम यश संपादन कराल याची मला खात्री आहे.

Make in india ,skill india,start up india & stand up india या धेयपथावरआपला देश चालला आहे.

हा धेयपथ तुम्हाला आत्मनिर्भर ,जबाबदार व स्वाभिमानी नागरिक बनण्यास मदत करेन.

आज मी तुम्हाला काही करिअर साठी मार्ग सांगत आहे.

त्यापैकी जर कोणता मार्गाबद्दल अडचण किंवा माहिती हवी असल्यास आपण मला कंमेंट द्वारे विचारू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment)

 पोलीस भरती प्रक्रिया (Police recruitment process)

त्याची जाहिरात खालील प्रमाणे असते

एकूण पदे – 10000

पद – पोलीस शिपाई 

शिक्षण – 12 वि पास

वय – 18 ते 28 वर्ष 

Obc – 3 वर्ष सूट

Sc st 5 वर्ष सूट 

अशी जाहिरात आपल्यावर आपण आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे अपेक्षित असते.

तर आपण आज या लेखात पोलीस भरती प्रक्रिया पाहणार आहे.

विद्यार्थी मित्रानो! महाराष्ट्र पोलीस भरती ची  प्रक्रिया 2 परीक्षा द्वारे केली जाते.

त्यामध्ये प्रथम लेखी परीक्षा

आणि नंतर शारीरिक परीक्षा 

पोलीस भरती लेखी परीक्षा (Police Recruitment Written Examination)

 लेखी परीक्षा मध्ये 100 गुणांची परीक्षा असते त्यासाठी 90 मिनिटे चा कालावधी असतो.

पोलीस भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम (Police Recruitment Written Examination Course)

अंकगणित , सामान्य ज्ञान 

चालू घडामोडी

बुद्धिमत्ता चाचणी

मराठी व्याकरण

वरील अभ्यासक्रम मधील घटक आपण सविस्तर रित्या पाहू.

अंकगणित (arithmetic)

अंकगणित मध्ये खालील अभ्यासक्रम समाविष्ट आहे.

  • संख्या आणि संख्याचे प्रकार
  • बेरीज 
  • वजाबाकी
  • गुणाकार
  • भागाकार
  • कसोट्या
  • पूर्णक
  • मसावी
  • लसावी
  • वर्ग आणि वर्गमूळ
  • घन आणि घनमूळ
  • शेकडेवारी
  • भागीदारी
  • गुणोत्तर व प्रमाण
  • सरासरी
  • काळ 
  • काम 
  • वेळ
  • दशमान पद्धत
  • नफा 
  • तोटा
  • सरळव्याज
  • चक्रवाढ व्याज
  • घड्याळ वर आधारित प्रश्न
  • घातांक आणि घातांकाचे नियम
  •  हे सर्व विषय लेखी परीक्षा साठी महत्त्वाचे आहे.

सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (General knowledge and current affairs)

 यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचा इतिहास आणि भूगोल ,राज्यशास्त्र आणि राज्यघटना , सामान्य विज्ञान याचा समावेश होतो.

त्याचबरोबर क्रीडा मधील पुरस्कार ,वर्षभर झालेल्या घडामोडी अबी सर्व विकास योजना याचा देखील समावेश होतो.

आता आपण या अभ्यासक्रमात कोणते विषय असतील हे सविस्तर पाहू.

इतिहास  मध्ये खालील विषय असतात

  • 1857 चा उठाव
  • भारताचे व्हाइसरॉय
  • समाज सुधारक
  • राष्ट्रीय सभा
  • भारताचा स्वतंत्र लढा 
  • ऑगस्ट घोषणा व वयक्तिक सत्याग्रह चळवळ
  • 1909चा कायदा
  • 1919 चा कायदा 
  • 1935 चा कायदा
  • हिंदुस्थान सोसिअल रिपब्लिकन आर्मी
  • राज्यघटना मधील अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे
  • भारताची राज्यघटना
  • राष्ट्रपती
  • लोकसभा
  • राज्यसभा
  • विधानसभा
  • विधानपरिषद
  • परिशिष्ट
  • मूलभूत कर्तव्य आणि अधिकार
  • राज्यपाल
  • मुख्यमंत्री
  • उपराष्ट्रपती
  • पंतप्रधान
  • संसद या प्रकारे विषयला अनुसरून प्रश्न असतील.
  • पंचायतराज 
  • ग्रामप्रशासन
  • समिती आणि शिफारस।
  • घटना दुरुस्ती
  • ग्रामसभा आणि ग्राम पंचायत समिती
  • जिल्हाप्ररिषद
  • मुख्य कार्यकारी अधिकारी
  • गटविकास अधिकारी
  • नगरपालिका 
  • नगरपरिषद
  • महानगरपालिका
  • ग्रामीण मुलकी आणि पोलीस प्रशासनाने

याचबरोबर सामान्य विज्ञान ची कसोटी देखील द्यावी लागते.

त्यात प्रामुख्याने विविध शास्त्र आणि त्यांचं अभ्यास, शास्त्रीय उपकरणे आणि त्याचा वापर , शोध आणि त्यांचे जनक, शास्त्रीय उपकरणे यांचा अभ्यास आहे.

 बुद्धिमत्ता चाचणी (IQ test)

ज्यामध्ये तुम्हाला संख्यामालिका , अक्षरमालिका 

  • वेन आकृती 
  • सांकेतिक भाषा 
  • दिशा आधारित प्रश्न
  • नातेसंबंध वर प्रश्न
  • घड्याळ वर आधारित प्रश्न
  • तर्कवितर्क प्रश्न

व्याकरण (Grammer)

  • समान-विरुद्धअर्थी शब्द, 
  • अलंकार
  • लिंग वचन
  • संधी
  • मराठी वर्ण माला
  • नाम
  • सर्वनाम
  • विशेषण
  • क्रियापद
  • काळ
  • प्रयोग
  • समास
  • वाक्प्रचार
  • म्हणी

ही झाली लेखी परीक्षा.

यात पास झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी परीक्षा  (Physical test examination) द्यावी लागते.

शारीरिक चाचणी मध्ये  महिला आणि पुरुष याना 50 पैकी गुणांची चाचणी करण्यात येते.

पुरुष साठी धावणी मोठी 1500 मीटर 30 गुणांची परीक्षा असते.

तर महिलेसाठी धावणी मोठी 800 मीटर 30 गुणांची परीक्षा असते.

पुरुष आणि महिला याना धावणी लहान मध्ये 100 मीटर अंतरावर 30 गुणांची परीक्षा द्यावी लागते.

4 किलोचा गोलफेक हा फक्त पुरुषासाठी 10 गुणांचा आहे.

अशे एकूण 50 गुण आणि लेखी परीक्षा चे 100 गुण एकुण 150 गुण असल्यावर कमीतकमी आपण 140 चे टार्गेट ठेवणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर पुरुषाची उंची 165 पेक्षा कमी नसावी .

आणि छाती न फुगवता 79 सेमी कमीतकमी पाहिजे.

महिला साठी उंची 155 सेमी कमीतकमी पाहिजे.

पोलीस भरती कागदपत्रे 2021 (Police Recruitment Documents 2021)

हे सर्व प्रकारच्या परीक्षा पास झाल्यावर पुढील महत्त्वाचे काम म्हणजे आवश्यक ते कागदपत्रे जमा करणे.

खाली मी आवश्यक कागदपत्रे सांगत आहे.

1 Certificate and mark sheet of qualified examination

2 adhar card

3 proof of education

4 Date of birthday

5 ssc certificate

6 NOC 

ही कागदपत्रे सादर केल्यावर तुम्हाला जॉइनिंग लेटर मिळेल.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy