मानवी जीवणातील विज्ञानाचे महत्व – The importance of science in human life

मानवी जीवणातील विज्ञानाचे महत्व (The importance of science in human life)

1)उपचार आणि चिकित्सा क्षेत्रातील योगदान : एक क्षण असा होता की सर्वसामान्य माणसाला जेव्हा एखादा आजार जडत होता तेव्हा त्या आजाराने तो सतत पिडित राहायचा कारण त्याला वेळेवर योग्य तो उपचार उपलब्ध व्हायचा नाही.कारण तेव्हा उपचाराची एवढी साधने आणि सोयीसुविधा नव्हत्या.रोगांवर औषधे उपलब्ध नव्हती त्यामुळे मानवाला आपले प्राण गमवावे लागत होते.पण आता तसे राहिले नाहीये विज्ञानामुळे आज आपण पाहिजे त्या दुर्दम्य आजारावर उपचार करू शकतो.कोणताही आजार बरा करण्यासाठी लागणारी पुरेशी आधुनिक संसाधने तसेच गोळया औषधांचा साठा आज आपल्याकडे उपलब्ध आहे.हे सर्व शक्य झाले ते विज्ञानामुळेच.

एवढेच नाही तर आज कोरोनासारख्या महामारीवर जागोजागी रूग्णांवर उपचार केले जात आहेत याला कारण देखील विज्ञानच आहे.कारण विज्ञानामुळेच आज आपण कँन्सर सारख्या दुर्गम्य आजाराने ग्रस्त व्यक्तीला देखील बरे करू शकतो.

2)परिवहन क्षेत्रातील योगदान :आज विज्ञानामुळेच एका ठिकाणाहुन दुसरे ठिकाणी हवेच्या माध्यमातुन म्हणजेच विमानाने,हँलिकाँप्टरने आपण ये जा करू शकतो.

पाण्यावर तरंगत माणुस एका जागेवरून इतर जागी जाऊ शकेल अशी कल्पणाही मानवाने कधी केली नव्हती ती विज्ञानामुळे सत्यात उतरली त्याचमुळे आज आपण जहाजाचा वापर करून कुठेही जाऊ शकतो.

एका ठिकाणाहुन इतर जाण्यासाठी आज आपण जी दुचाकी,चारचाकी वाहने वापरतो ही सर्व विज्ञानाचीच अमुल्य देणगी आहे.जिच्यामुळे आज आपण एका देशात बसुन इतर देशातील लोकांना मोबाईलवर बघु शकतो त्यांच्याशी गप्पा मारू शकतो.

3) घरगुती कार्यात विज्ञानाचे योगदान :आज विज्ञानाने असे काही शोध लावले आहेत की ज्यामुळे आपण विना हाताला त्रास देता आरामात कपडे धुवू शकतो.कोणतेही चुल न मांडता गँसवर शेगडीवर आरामात स्वयंपाक करू शकतो.फ्रिजचा वापर करून रोजचे अन्न,भाजीपाला फळे ताजा ठेवू शकतो.

4) शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्रातील विज्ञानाचे योगदान :आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे

घरबसल्या तसेच कुठेही न जाता परदेशातील महाविद्यालयातुन देखील आँनलाईन व्हिडिओ काँन्फरसद्वारे मोबाईल इंटरनेटवरून शिक्षण घेऊ शकतो.पाहिजे तो अभ्यास आपण आँनलाईन इंटरनेट वरून गुगल युटयुबचा वापर करून करू शकतो.

टिव्हीवर खुप वर्षापुर्वी लागलेला एखादा चित्रपट तसेच आपल्याला हवा तो मालिकेचा एपिसोड देखील इंटरनेटवरून डाऊनलोड करून कधीही बघु शकतो.

टीव्हीवर मनोरंजनासाठी मालिका तसेच चित्रपट बघु शकतो.आणि हे सर्व शक्य झाले विज्ञानाने लावलेल्या शोधांमुळे.

5) कृषी क्षेत्रातील विज्ञानाचे योगदान :आज टँक्टरच्या शोधामुळे आपण कमी वेळात जास्तीत जास्त शेती करू शकतो.वैज्ञानिक पदधतीने शेती करून खतांचा वापर करून चांगले पीक उत्पादन काढु शकतो.

6) प्रकाशन क्षेत्रात विज्ञानाचे योगदान : आज वर्तमानपत्रे ज्या प्रिंटिंग मशिनच्या मदतीने छापली जातात तो देखील विज्ञानाचाच एक मुख्य अविष्कार आहे.ज्यामुळे आज आपण छपाई यंत्राचा वापर करून पाहिजे तेवढी वर्तमानपत्र छापु शकतो.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy