मासेपालन व्यवसाय माहीती ।Fisheries business information ।मासे पालन व्यवसाय माहिती मराठी
मासेमारी हा कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.मासेमारी हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन म्हणुन देखील ओळखले जाते.मासेमारी हा एक असा व्यवसाय असतो ज्यात आपल्याला मासे पकडुन ते पाळावे लागतात.आणि मग तेच मासे मोठे झाल्यावर बाजारात जाऊन ते विकायचे असतात.
मासेपालन व्यवसाय माहीती ।Fisheries business information ।मासे पालन व्यवसाय माहिती मराठी
आज पाहावयास गेले भारतात जितक्या प्रमाणात मासे असणे गरजेचे आहे तितक्या प्रमाणात माश्यांचा पुरवठा असलेला आपणास दिसुन येत नाही.याचकरिता हा व्यवसाय जास्तीत जास्त सुरू होण्यासाठी सरकार आपणास अनुदान देखील देत आहे.कारण मासे हे आपण खाण्यासाठीच नव्हे तर औषध म्हणुन देखील वापर केला जातो.आजच्या लेखात आपण ह्याच मासेमारी व्यवसाया विषयी माहीती जाणुन घेणार आहोत.
मासेपालनव्यवसायकाय असतो?
मासेपालन यालाच आपण मत्स्यपालन असे देखील म्हणत असतो.ह्या व्यवसायात आपल्याला नदी तसेच समुद्रावर जाऊन मासे पकडायचे असतात.आणि पकडलेले मास्यांना खाद्य वगैरे खाऊ घालुन त्यांचे संगोपण करायचे असते आणि मग ते मासे मोठे झाल्यावर बाजारात जाऊन विकायचे असतात.
मासे पालनाचाव्यवसायआपण कोणकोणत्यापदधतीनेकरू शकतो?
मासे पालन करण्यासाठी आज आपण आपणास हव्या असलेल्या कोणत्याही एका पदधतीचा विविध पदधतींमध्ये वापर करू शकतो.यासाठी आपण मासेपालनाच्या पदधतींविषयी अगोदर समजुन घेऊ.
मासे पालनाच्या पदधती :
1) पिंजरा पदधतीचा वापर :
2) एखादा कृत्रिम तलाव बनवू शकतो :
3) बायोप्लोक मासेपालन :
4) घरात किंवा एखाद्या बंद खोलीमध्ये :
1) पिंजरा पदधतीचा वापर :
पिंजरा पदधतीचा वापर आपण समुद्र,नदी तलाव अशा ठिकाणी मासे पकडण्यासाठी वापरत असतो.यामध्ये आपल्याला जास्त भांडवल देखील लागत नसते.फक्त जेव्हा मासे पकडायचे असतात तेव्हाच इथे आपल्याला खर्च करावा लागत असतो.शेड उभा करणे, तलाव बांधणे,मासे विकत घेणे यासाठी कोणताही खर्च करावा लागत नसतो.
2) एखादा कृत्रिम तलाव बनवू शकतो :
आपण शेतीसाठी जे पाणी एखाद्या तळयात साठवत असतो त्यात सुदधा आपण मासे पालन करू शकतो.
किंवा आपण कृत्रिम तलाव देखील बांधु शकतो.
यात आपल्याला तळ बांधण्यासाठी,आँक्सिजन साठी,मासे विकत घेण्यासाठी,माशांसाठी खाद्य विकत घेण्यासाठी,इत्यादी खर्च करावा लागतो.
3) बायोप्लोक मासेपालन :
बायोप्लेक मध्ये आपण एखादे लहान तळ बांधत असतो आणि जे 5 ते 10 मीटर व्यास तसेच गोल आकाराचे असते.आणि मग त्यात आपण मासेपालन करत असतो.
बायोप्लेक मासे पालन व्यवसायासाठी आधी आपल्याला तळ बांधण्यासाठी 20 ते 30 हजाराचा खर्च करावा लागतो.
4) घरात किंवा एखाद्या बंद खोलीमध्ये :
यात आपण आपल्या घरातील एखाद्या बंद खोलीत मासे पाळता येईल असे वातावरण तयार करायचे असते.आणि घरातच किंवा बंद खोलीत मासेपालन करायचे असते.
नवीन मासेपालनव्यवसायसुरू कसा
कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्या अगोदर आपल्याला तो कशा पदधतीने करायचा तसेच त्यात आपल्याला काय अडीअडचणी येऊ शकतात आणि त्यातुन आपण बाहेर कसे पडायचे?हे माहीत असणे फार गरजेचे असते.कारण त्याशिवाय आपल्याला दिर्घकाळ त्या व्यवसायात यश प्राप्त करणे खुप अवघड जात असते.
म्हणुन मासेपालन व्यवसाय सुरू करण्याआधी तो व्यवसाय कसा करायचा असतो?त्यासाठी आपल्याला कोणती पुर्वतयारी करावी लागत असते.त्यासाठी आपल्याला कोणती उपकरणे लागु शकतात?हे आपल्याला ज्ञात असणे फार गरजेचे असते.
चला तर मग जाणुन घेऊया मासेपालन व्यवसाय सुरू करण्याच्या प्रक्रियेविषयी.
नवीन मासेपालन व्यवसाय सुरू करण्यासाठीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे :
1) सर्व प्रथम मासे पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण मासेपालन व्यवसायाविषयी अधिक माहीती प्राप्त करावी.त्याचे योग्य ते प्रशिक्षण प्राप्त करावे.
मासेपालनासाठी आवश्यक असलेली सर्व महत्वाची माहीती संकलित करावी.जसे की मासे कुठे विकायचे असतात?माशांसाठी खाद्य कुठे मिळते?मासे पालन व्यवसाय करताना आपल्याला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो.
2)मग माहीती प्राप्त केल्यानंतर मासे पालनासाठी एक जागा निवडायची असते.पण जागा निवडताना आधी हे ठरवुन घ्यावे की आपल्याला कोणत्या पदधतीने मासेपालनाचा व्यवसाय करायचा आहे? आणि मग त्यानुसार योग्य त्या जागेची निवड करावी.
3) मग मासेपालन व्यवसाय करण्यासाठी आपल्या निवडलेल्या पदधतीनुसार एक तळयाची बांधणी करायची असते.
4) मग माश्यांसाठी तळ उभारून झाल्यावर एखाद्या चांगल्या तसेच उत्तम ठिकाणी जाऊन दर्जेदार माशांची खरेदी करायची असते.
5) मग त्यांच्यासाठी उत्तम दर्जाचे खाद्य विकत घ्यायचे असते.कारण माशांना दर्जेदार उत्तम खाद्य दिले नाही तर त्यांची वाढ होत नसते.
6) आणि मग शेवटी ते मासे मोठे झाल्यावर बाजारात तसेच एखाद्या मार्केटमध्ये चांगला नफा होईल इतक्या किंमतीत विकायचे असतात.
मासे पालनव्यवसायसुरू करण्यासाठीकाही चांगल्यातसेच उत्तमप्रकारच्यामाशांचीनावे
1)तिलपिया
2) कँटफिश
3) रोहु
1)तिलपिया
तिलपिया हा मासा आपल्याला गोडया पाण्यात आढळुन येत असतो.हा मासा पाळणे खुप सोप्पे आहे.आणि याची वाढ देखील लवकर होत असते.
2) कँटफिश :
जर आपल्याला असा मासा मासेपालन व्यवसायासाठी हवा असेल ज्याची वाढ लवकरात लवकर होते तर अशा वेळी आपल्याकडे कंँटफिश मासा एक चांगला पर्याय आहे.
3) रोहु : रोहु मासा हा आपल्याला खारे पाणीमध्ये प्रामुख्याने आढळुन येत असतो.
काही इतर माशांची नावे कटला,सिल्वहर,काँमन,ग्रास,मृगल इत्यादी.
मासे पालनव्यवसायकरण्याचेफायदेकोणकोणतेअसतात ?
1)मासे पालन हा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडुन आपल्याला अनुदान प्राप्त होत असते.
2) याचसोबत सरकारकडुन आपल्याला सबसिडी देखील दिली जाते.
3) ह्या व्यवसायात खर्च थोडा आणि नफा जास्त प्रमाणात आहे.
अंतिमनिष्कर्ष: अशापदधतीनेआजआपणमासेपालनव्यवसायाविषयीमाहीतीजाणुनघेतलीआहे .आपल्याला ही माहीती कशी वाटली याबाबत आपल्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा आणि सदर माहीती इतरांसोबत देखील नक्की शेअर करा.