कर्जत ता.१९:तालुक्यातील माही जळगाव येथील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख व स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय महादेव शेटे (वय ४६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे ते “संजू नाना “या टोपणनावाने सर्वपरिचित होते.त्यांचे मागे आई,वडील,तीन भाऊ व एक बहीण,पत्नी,मूलगस,विवाहित मुलगी असा परिवार आहे.
एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले संजय शेटे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते.त्यांनी पाटेगाव गणातून पंचायत समितीची निवडणूक लढविली मात्र थोड्या मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.ते विविध सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी व्हायचे.हॉटेल सावन च्या माध्यमातून त्यांनी हॉटेल व्यवसायात चांगले यश मिळविले होते.ते राष्ट्रवादीचे पहिलवान सावन शेटे यांचे चुलते होत.त्यांना आमदार रोहित पवार,माजी मंत्री प्रा राम शिंदे,खासदार डॉ सुजय विखे पाटील,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी,राष्ट्रवादीचे प्रा मधुकर राळेभात व विजय मोढळे,,जेष्ठ नेते एड.कैलास शेवाळे,प्रा.शहाजी देवकर,शिवसेनेचे जेष्ठ नेते बळीराम यादव,तालुका प्रमुख दीपक शहाणे,महावीर बोरा,अमृत लिंगडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा किरण पाटील,बाळासाहेब सपकाळ,डॉ.राजेश तोरडमल आदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.