मिरजगाव मधे मुख्यध्यापकांना कोरोनाची लागन Coronation of the headmaster in Mirajgaon
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य कोरोना पॉझिटिव्ह आले. तपासणी केल्यानंतर काल हा अहवाल प्राप्त झाला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विद्यालय बंद ठेवण्याचे आदेश कर्जतच्या गटशिक्षणाधिकारी मिना शिवगुंडे यांनी दिले आहेत. तरी मात्र आज शुक्रवारी शाळा भरवण्यात आली होती त्यामुळे शाळा प्रशासने कोरोना संसर्गाबाबत लक्ष देणे गरजेचे आहे.
अहमदनगर : माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना करोनाची लागण.Ahmednagar: Maji Minister Pvt. Ram Shinde Yana Karonachi Lagan. | http://ahmednagar.itechmarathi.com/2021/03/ahmednagar-maji-minister-pvt-ram-shinde.html
नूतन विद्यालय हे तालुक्यातील मोठे व हजारो विद्यार्थी शिक्षण घेणारे विद्यालय असून या विद्यालयात संसर्गाची भीतीही तितकीच आहे. विद्यालयाचे प्राचार्य पोझीटिव्ह आल्याने शाळा प्रशासन, विद्यार्थी पालक व मिरजगावमध्ये खळबळ माजली आहे.पाचवीच्या पुढील वर्ग सध्या सुरू आहे. शाळेत शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने विद्यालय बंद ठेवण्याचे सूचित केले आहे. सात दिवसांसाठी शाळा बंद होणार असल्याची माहिती शिवगुंडे यांनी दिली आहे परंतु अजूनही तशी सूचना विद्यार्थ्यांना मिळाली नाही ती सूचना लवकरात लवकर जाहीर करून कोरोन संसर्ग टाळायची गरज निर्माण झाली आहे.