मोटरसायकल चोरी प्रकरणी तिघांना अटक karjat live news
दिनांक 09/04/2021रोजी पहाटे 2.00 वाजनेच्या सुमारास वडारवस्ती सिद्धटेक येथे हृषिकेश परशुराम सूर्यवंशी रा वडारवस्ती, सिद्धटेक ता कर्जत यांना काहीतरी पडल्याचा आवाज आला. घराबाहेर येऊन पाहिले तर लावलेली दुचाकी त्या ठिकाणी नव्हती. त्यांनी तात्काळ कर्जत पोलीस आणि नागरिकांशी संपर्क साधला. स्थानिक नागरिक ऋषिकेश सूर्यवंशी,राजु लष्कर किशोर सांगळे, अमोल चिंतामणी सांगळे, बाबुराव विटेकर, विजय तांदळे, दत्ता सांगळे, शहाजी पोटे सचिन जाधव, महेश सांगळे रोहित सांगळे, सखाराम तांदळे, अमोल भोसले तसेच पोलीस पाटील दादासाहेब भोसले यांनी संशयित आरोपींचा सिद्धटेक पेट्रोल पंप येथपर्यंत पाठलाग केला आणि त्यांना ताब्यात घेतले दरम्यान कर्जत पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि जवान सदर ठिकाणी पोहोचले..
हृषिकेश परशुराम सूर्यवंशी रा वडारवस्ती ता कर्जत यांची 40 हजार रुपये किमतीची, निळया रंगाची बजाज डिस्कवर मोटार सायकल क्रमाक mh 45 R0881 ही चोरून घेऊन जात असताना 2 चोरट्याना रंगेहात पकडले.
वरील संशयीत पकडलेल्या इसमांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे
आकाश विठ्ठल माने वय 19 वर्ष, रा पोथरे, ता करमाळा जिल्हा सोलापूर,
विठ्ठल सुभाष माने वय 26 वर्ष, रा जेऊर, ता करमाळा जिल्हा सोलापूर असे असल्याचे सांगितले व पळून गेलेला इसमचे नाव अमोल श्रीधर माने, रा. दिघोळ, ता. जामखेड असे असल्याचे सांगितले. त्यावरून त्यास कर्जत पोलिसांनी माग काढून तांदुळवाडी, बारामती येथून अटक केली आहे.
सदर आरोपींना पोलीस स्टेशन येथे आणून कर्जत पोलीस स्टेशन गु र न 212/2021भा द वि 379,34प्रमाणे गुन्हा राजिस्टरी दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार मारुती काळे हे करीत आहेत.
सदरची कारवाई
पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील साहेब,
अप्पर पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल साहेब यांचे सूचना
व मार्गदर्शनाखाली अण्णा साहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत,
पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरेश माने ,पोलीस जवान मारुती काळे, अमित बरडे, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, गणेश ठोंबरे,चालक नितीन नरुटे यांनी केली आहे..